शुक्रवार, ९ मे, २०२५
अमरावतीचे राज्य माहिती आयुक्त पदाचा रविंद्र ठाकरे यांनी कार्यभार स्विकारला
अमरावती, दि. 9 : राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठ, अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त पदाचा कार्यभार रविंद्र हनुमंतराव ठाकरे यांनी दि. 8 मे 2025 रोजी स्विकारला आहे.
नुकतीच राज्य शासनाने राज्यातील राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठावर माहिती आयुक्तांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार श्री. ठाकरे यांची अमरावती खंडपीठ येथे नियुक्ती करण्यात आली आहे. एका शासकीय समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यभार स्विकारतांना अमरावती खंडपीठ कार्यालयातील उप सचिव देविसिंग डाबेराव, ॲड. डॉ. सुरेश कोवळे, तत्कालीन उप सचिव तसेच आयोगातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नवनियुक्त राज्य माहिती आयुक्त श्री. ठाकरे यांनी सर्वप्रथम आयोगातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांची ओळख करुन घेतली. तद्नंतर श्री. डाबेराव यांचेकडून कार्यालयीन कामकाजाबाबत आढावा घेतला व कार्यालयाची पाहणी करुन कामकाजास सुरुवात केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा