शुक्रवार, १६ मे, २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 'जनता दरबार' हैदराबाद हाऊस येथे दुपारी १२ ते २ या काळात नागरिकांची निवेदने स्वीकारणार
नागपूर, दि. १६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शनिवार, दि. १७ मे रोजी मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत.
मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांची निवेदने स्वीकारतील आणि त्यांची गार्हाणी ऐकून घेतील.
नागरिकांनी सकाळी ११ ते १२ या वेळेत आपल्या नावाची नोंदणी करुन टोकन घेणे आवश्यक आहे. टोकन क्रमांकाप्रमाणे नागरिकांची निवेदने स्वीकारली जातील, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा