मंगळवार, २० मे, २०२५

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करणे त्यासाठीची आवश्यक पदे उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चास मंजुरी. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात देण्यास मंजुरी. या जागेवर बायोमिथेशन तंत्राचा वापर करून दर दिवशी ५०० टन क्षमतेचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उभारणी करण्यात येईल. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना मंजुरी. यामुळे १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ९३ हजार ३१७ रोजगार निर्मिती होणे अपेक्षित‍. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस ५ हजार ३२९ कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २०२५.६४ कोटी रुपयांच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यता. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास ६३९४.१३ कोटींच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यता. पोशीर येथे १२.३४४ टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरांना पिण्याचे पाणी पुरविणार. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता. प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर ६.६१ टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा