गुरुवार, २ एप्रिल, २०२६

जिल्ह्यात कलम 38 लागू 

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात शांतता व सुव्य‍वस्था  अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) विशाल आनंद  यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा प्रतिबंधात्मक आदेश संपूर्ण अमरावती जिल्ह्यात, पोलीस आयुक्तांचे परिक्षेत्र वगळून  कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता दि. 2 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 पर्यंत लागू करण्यात आला आहे.

कोणीही सदर आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध   कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांनी कळविले आहे.

 

00000


 

विशेष लेख-

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी  ते  एप्रिलदरम्यान 

‘महा-साधना सप्ताह’!

 

          भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

          केंद्र शासनाने साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्यानंतर आता राज्यातही महा-साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत 8 लाख 80 हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी 7 दिवसांत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील 36 जिल्हे, 32 विभाग, आणि 6 विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असेल.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी

          साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम मिशन कर्मयोगी (Mission Karmayogi) चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय           अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे,वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

          महा-साधना सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे iGOT Karmayogi App द्वारे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येईल. अधिकारी आणि कर्मचारी आपले काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी होण्यास मदत होईल.या अभ्यासक्रमांमुळे प्रत्येकाला स्वत:ची क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.

महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत

          बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या शासकीय कामकाजात सुद्धा विविध डिजिटल प्रणाली, ॲप्सचा वापर होत आहे. महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर, नागरिक केंद्रित सेवा  आणि पारदर्शकता वाढविण्यास या सप्ताहाची मदत होणार आहे.

          या सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील विविध शासकीय कार्यालये. जिल्हा कार्यालये यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रम 2 ते 8 एप्रिल दरम्यान पूर्ण करणे गरजेचे असून कर्मयोगी भारत पोर्टलवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (या विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये) तसेच विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा) या सर्वांनी साधना सप्ताहात एकूण 4 तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे राहील. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

–वर्षा फडके – आंधळे, 

उपसंचालक (वृत्त)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

 

 

विशेष लेख-

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात ‘साधना सप्ताह’


 

          लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘साधना सप्ताह’ अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

          आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात होत असलेला वापर पाहता राज्य शासनाचाही तंत्रज्ञानाधारित कार्यक्रमात पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या गतिमान प्रशासनाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम आणि 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या पाठोपाठ आता केंद्रशासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच विभागीय आयुक्त कार्यालये आणि विभागांतर्गत येणारे जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद आदींमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताह अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा यासह प्रशासनातील विविध विभागामध्ये सक्षमपणे कार्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांना मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

          ‘कर्मयोगी भारत’ हा केंद्र शासनाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म व अभिनव राष्ट्रीय उपक्रम आहे. तंत्रज्ञान‑आधारित शिक्षणाद्वारे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कौशल्य आणि शासनक्षमता वाढविण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने ‘साधना सप्ताह’ अंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्म वरील तंत्रज्ञानाधारित ५० प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तयार केली आहे. या सप्ताह अंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यादीतील एकूण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी किमान चार तासांचे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ‘लोकप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूळ बाबी : शिकणे, उपयोग आणि नैतिकता’, ‘प्रशासनासाठी जबाबदार एआयचा उपयोग’, ‘सर्वांसाठी युवा ए आय’ असे एकूण 44 मिनिटे ते 46 तास काल मर्यादेचे एकूण  50 प्रशिक्षण कार्यक्रम कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

महासंचालकांच्या पुढाकाराने माहिती व जनसंपर्क विभागातही ‘साधना सप्ताह’

          केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रशासकीय क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेला ‘साधना सप्ताह’ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या विभागात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये, मुंबई येथील या विभागाचे मुख्यालय तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि पणजी येथील कार्यालयांमधील १००२ अधिकारी-कर्मचारी ‘साधना सप्ताह’ अंतर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. महासंचालक ब्रिजेस सिंह यांनी या संदर्भात बैठक घेऊन विभागाला सूचना दिल्या आहेत.

माहिती संचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही साधना सप्ताहाचा उत्साह

          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही ‘साधना सप्ताह’ अंतर्गत विभागातील एकूण 174 अधिकारी- कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यापूर्वी विभागातील शिपाई, वाहन चालक या वर्ग ‘ड’ पासून वरिष्ठ वर्ग ‘अ’ पर्यंतच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भारत पोर्टलवरील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये विशेषतः अमरावती विभागातील अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी  390 तास काल मर्यादेचे 294 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नागपूर विभागातून गडचिरोली चे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी 60 तास काल मर्यादेचे एकूण 63 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. साधना सप्ताहातही नागपूर अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी हिरीरीने भाग घेऊन विहित काल मर्यादेचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले आहे.

          बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या नव्या आव्हानात्मक विषयांचा परिचय होऊन प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे व गतिमानतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्या यासाठी केंद्र शासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यभर राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय भाग घेऊन जनता व शासनाप्रती आपली प्रतिबद्धता दृढ करण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे.

-रितेश मोतीरामजी भुयार

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

०००००००

 

 

विशेष लेख -                                                  

महा-साधना सप्ताह



          भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत "साधना सप्ताह" आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.

          शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि त्यांना तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने "साधना सप्ताह" हा उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता आपल्या राज्यातही "महा-साधना सप्ताह" २ ते ८ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. टेक लर्निंग वीक अंतर्गत ८ लाख ८० हजारांहून अधिकारी आणि कर्मचारी ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करणार आहेत. यामुळे जवळपास 35 लाखांहून अधिक वेळ अधिकारी आणि कर्मचारी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर वेगवेगळे अभ्यासक्रम शिकतील. यामध्ये राज्यातील ३६ जिल्हे, ३२ विभाग, आणि ६ विभागीय कार्यालये यामध्ये विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महा-साधना सप्ताहात सहभाग नोंदविणे गरजेचे असणार आहे.

          अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी साधना सप्ताह हा iGOT कर्मयोगी भारत अंतर्गत राबविला जाणारा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम मिशन कर्मयोगी (Mission Karmayogi) चा एक भाग असून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृध्दीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्टया सक्षम करण्यासाठी आयोजित केला जातो. एक आठवडाभर आयोजित केला जाणारा हा उपक्रम पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या स्वत:च्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पध्दती शिकतात. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, डिजिटल गव्हर्नन्स आणि नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, सतत शिक्षण घेत राहणे, वेळ व्यवस्थापन ही सप्ताह आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्टे असल्याने या सप्ताहात प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले आहे.

          महा-साधना सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे iGOT Karmayogi App द्वारे  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या वेळेनुसार प्रशिक्षण घेता येईल. अधिकारी आणि कर्मचारी आपले काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृध्दी होण्यास मदत होईल. या अभ्यासक्रमांमुळे प्रत्येकाला स्वत:ची क्षमता ओळखून त्यानुसार कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते.

          महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. बदलत्या काळाशी सुसंगत राहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. आजच्या शासकीय कामकाजात सुद्धा विविध डिजिटल प्रणाली, ॲप्सचा वापर होत आहे. महा-साधना सप्ताहामुळे प्रशासनात डिजिटल सक्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर, नागरिक केंद्रित सेवा  आणि पारदर्शकता वाढविण्यास या सप्ताहाची मदत होणार आहे.

          या सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील विविध शासकीय कार्यालये. जिल्हा कार्यालये यामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी iGOT कर्मयोगी भारत पोर्टलवर लॉग इन करुन त्यांना नेमून दिलेले अभ्यासक्रम या काळात पूर्ण करणे गरजेचे राहील. पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी किमान ४ तास असणे अनिवार्य आहे. सर्व अभ्यासक्रम २ ते ८ एप्रिल दरम्यान पूर्ण करणे गरजेचे असून कर्मयोगी भारत पोर्टलवर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (या विभागाच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालये) तसेच विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा) या सर्वांनी साधना सप्ताहात एकूण ४ तासांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे राहील. विशेष म्हणजे साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (iGOT) पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे विभागांना महाराष्ट्रात मे महिन्यात होणाऱ्या ‘TECH-वारी 2.0’ मध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विभागीय माहिती कार्यालय,  

अमरावती

 

 

 

 

साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

मराठीसाठी प्रदीप कोकरे यांना प्रदान


        नवी दिल्ली,  दि. १ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. कोकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित, अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, सचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मान्यताप्राप्त २३ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले. त्यात मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना  'खोल खोल दुष्काळ डोळे ' या रचनेसाठी हा सन्मान जाहीर झाला होता.

            साहित्याला मिळणारा पुरस्कार हा लोकमान्यतेचे प्रतीक असतो असे सांगून हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित म्हणाले, की  युवा अवस्था ही केवळ विशिष्ट कालावधीदर्शक संकल्पना नाही, तर ती एक चेतनेची जाणीव आहे. जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय दिशादर्शक काम केले आहे. आज देशात युवकांची मोठी संख्या आहे. ही ऊर्जा प्रेरित करण्यासाठी युवा लेखकांनी सकारात्मक जाणिवेचे लेखन करताना वाचकांना ज्ञानविज्ञानाशी जोडण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत.

अकादमीच्या सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

इतर भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते याप्रमाणे  - ( भाषा व लेखक)

* आसामी- सुप्रकाश भुयान

* बांगला - सुदेष्णा मोईत्रा

* बोडो - अमर खुंगुर बर

* इंग्रजी - अव्दैत कोट्टारी

* गुजराती  - मयुर खावडू

* हिंदी - पार्वती तिर्की

* कन्नड -  दिलीपकुमार आर

* कश्मीरी - साईका सहर

* कोकणी - ग्लिनिस डायस

* मैथिली - नेहा झा मणि

* मलयाळम् - अखिल धर्मजन

* मणिपुरी - अकोइजन जितेन सिंह

* नेपाली - सुवास ठकुरी

* ओडिया - सुब्रतकुमार  सेनापती

* पंजाबी  - मनदीप औलख

* राजस्थानी - पुनमचंद गोदारा

* संस्कृत - धीरजकुमार पाण्डेय

* संथाली  - फागू बास्के

* सिंधी -  मंथन बछाणी

* तमिळ  - लक्ष्मीहर टी

* तेलुगु - प्रसाद सुरी

* उर्दू -  नेहा रुबाब

0000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

बुधवार, १ एप्रिल, २०२६

#मंत्रिमंडळनिर्णय (संक्षिप्त)


 

दिलखुलास


 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात #हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नियोजन यासंदर्भात निवेदक संजय पाटोळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.


🗒️ दि. २ ते ३ एप्रिल, २०२६
⏰ सकाळी ७.२५ वा
📻 ‘News On AIR’ या ॲपवरही मुलाखत ऐकता येईल.

राज्यात ‘साधना सप्ताह’

 

 


 

विशेष लेख :-

गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : राज्यात साधना सप्ताह’

लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांद्वारे सोयी, सुविधा, लाभ आदी पोचविण्यासाठी शासन सक्षमपणे कार्य करते. आणि या व्यवस्थेची भिस्त असणारी प्रशासन व्यवस्था त्यामुळेच सक्षम असावी लागते. प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत  यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत 'साधना सप्ताह' आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही  मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 'साधना सप्ताह' अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


          आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात होत असलेला वापर पाहता राज्य शासनाचाही तंत्रज्ञानाधारित कार्यक्रमात पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या गतिमान प्रशासनाची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रम आणि १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या पाठोपाठ आता केंद्रशासनाचा 'साधना सप्ताह' राज्यात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंत्रालयीन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी तसेच विभागीय आयुक्त कार्यालये आणि विभागांतर्गत येणारे जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषद आदींमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी या सप्ताह अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा यासह प्रशासनातील विविध विभागामध्ये सक्षमपणे कार्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या उपयोगाधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांना मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 'TECH-वारी २.०' या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


             'कर्मयोगी भारत' हा केंद्र शासनाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म व अभिनव राष्ट्रीय उपक्रम आहे. तंत्रज्ञानआधारित शिक्षणाद्वारे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कौशल्य आणि शासनक्षमता वाढविण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर विविध प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केंद्र शासनाने 'साधना सप्ताह' अंतर्गत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कर्मयोगी प्लॅटफॉर्म वरील तंत्रज्ञानाधारित ५० प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तयार केली आहे. या सप्ताह अंतर्गत प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यादीतील एकूण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी किमान चार तासांचे प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये 'लोकप्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता', 'आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूळ बाबी : शिकणे, उपयोग आणि नैतिकता', 'प्रशासनासाठी जबाबदार एआयचा उपयोग', 'सर्वांसाठी युवा ए आय' असे एकूण ४४ मिनिटे ते ४६ तास काल मर्यादेचे एकूण  ५० प्रशिक्षण कार्यक्रम कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


महासंचालकांच्या पुढाकाराने माहिती व जनसंपर्क विभागातही ‘साधना सप्ताह’

केंद्र शासनाच्या सूचनानुसार प्रशासकीय क्षमता सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेला ‘साधना सप्ताह’ हा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात या विभागात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा माहिती कार्यालये, मुंबई येथील या विभागाचे मुख्यालय तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली आणि पणजी येथील कार्यालयांमधील १००२ अधिकारी-कर्मचारी 'साधना सप्ताह' अंतर्गत विविध प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. महासंचालक ब्रिजेस सिंह यांनी या संदर्भात बैठक घेऊन विभागाला सूचना दिल्या आहेत.

माहिती संचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही साधना सप्ताहाचा उत्साह

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर- अमरावती विभागातही 'साधना सप्ताह' अंतर्गत विभागातील एकूण 174 अधिकारी- कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यापूर्वी विभागातील शिपाई, वाहन चालक या वर्ग 'ड' पासून वरिष्ठ वर्ग 'अ' पर्यंतच्या सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी भारत पोर्टलवरील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. यामध्ये विशेषतः अमरावती विभागातील अकोला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी  390 तास काल मर्यादेचे 294 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहेत. तर नागपूर विभागातून गडचिरोली चे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी 60 तास काल मर्यादेचे एकूण 63 प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले आहे. साधना सप्ताहातही नागपूर अमरावती विभागातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी हिरीरीने भाग घेऊन विहित काल मर्यादेचे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत आणि या संदर्भातील नियोजन करण्यात आले असल्याचे विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले आहे.

  बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रशासनाला गतिमान करण्यासाठी शासन स्तरावर सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा या नव्या आव्हानात्मक विषयांचा परिचय होऊन प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक सक्षमपणे व गतिमानतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडता याव्या यासाठी केंद्र शासनाचा ‘साधना सप्ताह’ राज्यभर राबविण्यात येत आहे. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात सक्रिय भाग घेऊन जनता व शासनाप्रती आपली प्रतिबद्धता दृढ करण्याचे आवाहनही शासनातर्फे करण्यात आले आहे.

 

      रितेश मोतीरामजी भुयार,

माहिती अधिकारी,

  माहिती व जनसंपर्क नागपूर.

    

०००००००