सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२६


माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास कार्यक्रमात #मराठीभाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. 

मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करून तिचे आधुनिक ज्ञानभाषेत रूपांतर आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना, शैक्षणिक वाटचाल, संशोधनकार्य आणि भविष्यातील विकास संकल्पनांचा आढावा घेणारी कुलगुरू प्रा. डॉ. आवलगावकर यांची विशेष मुलाखत ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दि. ११ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. 

निवेदक आशिष गवांदे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत विद्यापीठाची संकल्पना, रिद्धपूरचे ऐतिहासिक योगदान, प्राचीन हस्तलिखिते व दुर्मीळ ग्रंथांचे जतन आणि डिजिटायझेशन, संशोधन, शैक्षणिक अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या संधींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.


00000

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा