शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६

खोट्या भरतीवर विश्वास ठेवू नये

कृषी विभागाच्या बनावट भरती

जाहिरातीविषयी विभागाचे स्पष्टीकरण

 

अमरावती दि. ६ : महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग यांच्या नावाने समाज माध्यमांवर आणि इंटरनेटवर एक बोगस (बनावट) भरती जाहिरात क्र. ३४१२, ८ ऑक्टोबर २०२६ फिरत असल्याचे समोर आले आहे. या जाहिरातीमध्ये 'क्लार्क वर्ग-३ (गट-क)' या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आल्याचे दर्शविले आहे. विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती कार्यालयाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे की, अशी कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली नसुन हे पत्र पूर्णपणे बनावट, खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. सदर जाहिरातीशी या कार्यालयाचा कोणताही अधिकृत संबंध नाही.

तरी कोणत्याही सुशिक्षित बेरोजगार उमेदवाराने किंवा नागरिकाने या बोगस पत्राला आणि भूलथापांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या फसव्या जाहिरातींपासून सावध राहावे. कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकृत भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते. नागरिकांनी किंवा उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट जाहिरात/पत्राच्या आधारे अर्ज /कागदपत्रे सादर करू नयेत, असे आवाहन विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. प्रशांत नाईक यांनी केले आहे.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा