जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी
परिक्षेचा निकाल जाहीर
अमरावती, दि.3: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय
मंडळांमार्फत जुलै-2019 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. संकेतस्थळावर
विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण असून या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची
पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित संबंधित नमुन्यात
विहित शुल्कासह दि. 9 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा. अर्जासोबत
ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. ज्या विद्यार्थ्यांना
उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर
विहित नमुन्यात, विहित शुल्कासह दि. 19 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे
अर्ज सादर करावा.
मार्च 2020 मधील माध्यमिक
शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे
आहे अशा पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी
तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व अन्य विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन
पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस
पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार जुलै
2019 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
तरतुदीच्या अधीन देय दोन संधी उपलब्ध राहतील. असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ,
पुणे यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा