मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

इयत्ता 10 वी व 12 वी खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे


इयत्ता 10 वी व 12 वी
खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी
30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 17; इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षा देता येईल. खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमीत शुल्काने भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. 1 ऑक्टोबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळअर्ज, विहित शुल्क अर्जावर नमूद शाळा/महाविद्यालयात जमा करावे.
खाजगीरित्या परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in, http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो ऑनलाईन स्कॅन करुन अपलोड करावा. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे        (examination form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे सविच, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा