बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९


आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी
20 पर्यंत अर्ज आमंत्रित

अमरावती,दि.11- अमरावती जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याकरिता ईच्छुक अपंग उमेदवार/बचत गट यांच्या कडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे केंद्र फक्त अपंग व्यक्ती व बचतगट यांना वितरित करण्यात येणार आहेत. अपंग व्यक्ती व बचतगटांनी www.amravati.gov.in या संकेतस्थळावरील दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जात माहिती सादर करावी. अपंग उमेदवार व बचत गटांनी आपले अर्ज जिल्हा सेतु समिती, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत दि. 20 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत सादर करावे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.  
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा