विभागीय लोकशाही दिनात सात प्रकरणे दाखल
·
प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली
काढण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना
अमरावती,दि.9- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या
सभागृहात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे
कामकाज करण्यात आले. विभागातून लोकशाही दिनासाठी एकूण
सात प्रकरणे दाखल करण्यात आलीत. दाखल प्रकरणांवर योग्य कार्यवाही
करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. सिंह यांनी दिल्या. विविध विभागाशी संबंधित असलेली प्रलंबित प्रकरणे अनेक
दिवस प्रलंबित न ठेवता तत्काळ निकाली काढावित तसेच केलेल्या कार्यवाहीच्या
अहवालाची प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावी,
असे निर्देशही
त्यांनी बैठकीत दिले.
आज विभागीय लोकशाही
दिनात सादर करण्यात आलेल्या सात प्रकरणापैकी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती एक प्रकरण,
भूमि अभिलेख कार्यालयाचे एक प्रकरण असून जि.प.अमरावती एक प्रकरण सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ एक प्रकरण, जि.प. यवतमाळचे दोन आणि नगरपालिकेचे एक प्रकरण सादर करण्यात आले. अशी एकूण 7 प्रकरणे श्रीमती वैशाली
पाथरे यांनी सादर केली. यापैकी 3 प्रकरणे आजच्या लोकशाही दिनात निकाली काढण्यात आली.अमरावती
जि.प. च्या एका प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रलंबित ठेवण्याबाबतचे
निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले.
विभागीय लोकशाही दिनाच्या
कामकाजासाठी भूमी अभिलेख,जिल्हा परिषद, मनपा अमरावती,
कृषी विभाग या
कार्यालयांचे संबंधित अधिकारी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा