शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

अकोला,वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस


अकोला,वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस
Ø  विभागात 55 तालुक्यात पाऊस
अमरावती, दि.21: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात 55 तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 3.0 (651.5), भातकूली 14.9 (434.8), नांदगाव खंडेश्वर 12.0 (648.0), चांदूर रेल्वे निरंक (770.2), धामणगाव रेल्वे 0.7 (787.8), तिवसा 2.5 (632.3), मोर्शी 3.1 (713.1), वरुड 0.6 (648.2), अचलपूर 15.1 (684.5), चांदूर बाजार 23.2 (944.5), दर्यापूर 15.0 (602.2), अंजनगाव 30.3 (559.8), धारणी 21.8 (1423.1), चिखलदरा 56.3 (1827.5), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 14.2 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 809.1 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 21 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 106.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 99.3 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 39.2 (605.3), बार्शी टाकळी 82.1 (821.3), अकोट 38.8 (812.0), तेल्हारा- 71.3 (810.5), बाळापूर 55.1 (748.2), पातूर 73.4 (805.3),मुर्तीजापूर 13.0 (542.9), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 53.3 मि.मि तर आजवर 735.1 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 21 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 112.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 105.4 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 4.1 (379.7), बाभूळगाव 3.0 (554.2),कळंब 0.3 (466.4),आर्णी 7.0 (618.4), दारव्हा 11.4 (404.3), दिग्रस 13.3 (465.3), नेर 6.6 (427.1), पुसद 24.0 (549.0), उमरखेड 6.1 (546.4), महागाव 5.7 (501.8), केळापूर 3.9 (520.0), घाटंजी 7.7 (506.4), राळेगाव 0.7 (537.9), वणी 0.7 (640.9), मारेगाव 0.4 (588.9), झरी जामणी 8.6 (529.9) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 6.5 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 514.8 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 21 सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 60.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 56.5 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 2.3 (806.4), चिखली 7.9 (599.2), देऊळगाव राजा 4.9 (406.3), मेहकर 23.3 (590.7), लोणार 6.8 (512.0), सिंदखेड राजा 11.8 (562.2), मलकापूर 16.4 (726.6), नांदूरा 11.8 (649.6), मोताळा 14.7 (599.0), खामगाव 22.7 (617.0), शेगाव 11.6 (635.9), जळगाव जामोद 2.1 (625.8) संग्रामपूर 41.1 (820.3)  जिल्ह्यात दिवसभरात 13.6 तर यंदाच्या हंगामात आजवर 627.0 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 21 सप्टेंबर कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 100.6 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 93.9 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 35.8 (579.6), मालेगाव 25.7 (580.7), रिसोड 18.1 (587.9), मंगरुळपिर 42.1 (526.0), मानोरा 17.8 (428.3), कारंजा 31.3 (481.7), जिल्ह्यात 24 तासात 28.5 तर 1 जून पासून आजवर 530.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 21 सप्टेंबर या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 70.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 66.4  टक्के इतके आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा