मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी
30 सप्टेंबरपर्यंत मूदतवाढ
अमरावती, दि. 17; राज्य मुक्त विद्यालयातील
इयत्ता 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेण्यासाठी दिनांक 15
सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी प्रवेश अर्ज स्विकारण्यात येणार होते. परंतु अर्ज
स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थी आता दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत
ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज सादर करु शकतील. 3 ऑक्टोंबर पर्यंत मूळ अर्ज, विहित शुल्क
अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्राच्या शाळेमध्ये जमा करण्यात येईल. अधिक
माहिती मंडळाच्या http://msbos.mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे, विभागीय सचिव, अमरावती विभागीय
मंडळ यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा