सोमवार, २९ जून, २०२०

परदेशात पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी 5 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे

परदेशात पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी
5 जुलैपर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 29 : परदेशात पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांनी 5 जुलै पर्यंत आपले अर्ज सादर करावे असे आवाहन धारणीचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. आदिवासी विकास विभागातर्फे राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दि. 5 जुलै 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आादिवासी विकास प्रकल्प धारणी येथे सादर करावे. विद्यार्थ्यांना एम.बी.ए, वैद्यकिय अभ्यासक्रम, बी.टेक, विज्ञान, कृषी व इतर विषयांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून दहा विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यास इयत्या 12 वी व पदवी अभ्याक्रमात प्राप्त गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी, धारणी कार्यालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी 5 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे असे प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कळविले आहे.

****

शुक्रवार, २६ जून, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन


विभागीय आयुक्त कार्यालयात 
राजर्षि शाहू महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. २६ : विभागीय आयुक्त कार्यालयात आज राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, प्रमोद देशमुख, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, २४ जून, २०२०

वसतीगृह इमारत भाड्याने मिळणेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


वसतीगृह इमारत भाड्याने मिळणेसाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 24 :  आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी ता. धारणी जि. अमरावती अंतर्गत येत असलेल्या आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृह अमरावती करीता सर्व सोयी सुविधायुक्त विद्यार्थ्यांच्या निवासाकरीता 1000/500 व 300 क्षमता असलेली इमारत भाडेतत्वावर घ्यावयाची आहे. त्यासाठी इच्छुक इमारत मालकांनी दि. 30 जून, 2020 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
****

सोमवार, २२ जून, २०२०

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019-20




गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2019-20
खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास योजनेचा लाभ
अमरावती, दि. 22 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.
या योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे  सुभाष नागरे यांनी कळविले आहे.
****

शुक्रवार, १९ जून, २०२०

परदेशातील शिक्षणासाठी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे


परदेशातील शिक्षणासाठी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे
*अपर आदिवासी आयुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 19 :  परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी केले आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज दि. 25 जून 2020 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी किंवा औरंगाबाद येथे सादर करावे लागणार आहे.. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी दि. 25 जूनपर्यंत अर्ज सादर करावे, असे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी कळविले आहे.
****

बुधवार, १७ जून, २०२०

मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे - सुनिल केदार







मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी  क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे
                                                                                                                         -  सुनिल केदार

मुंबई ,दि.१७:  मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी,  क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे आहे.  मैदानी खेळामुळे आत्मविश्वास निर्माण होतो .याआत्मविश्वासाने मुले सर्व क्षेत्रात प्रगती करू शकतात असे प्रतिसाद राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास ,क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालय अमरावती,ई एल एम एस स्पोर्टस रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार चे आयोजन 17 -20 जून या दरम्यान होणार आहे आज उद्घाटन माननीय श्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये  प्रत्येक मुलाचे जीवन क्रियाशील होण्याकरिता तयार केलेला दृष्टिकोन या विषयावर आयोजित चार दिवसाच्या व्याख्यानमालेत श्री.केदार बोलत होते.
श्री केदार म्हणाले, सर्व मुलांमध्ये शारीरिक साक्षरता विकसित करण्यासाठी पालक,  शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असते. तसेच मुलांच्या विकासात गुंतलेल्यांना शारीरिक साक्षरतेचा अर्थ काय आहे आणि ते कसे विकसित केले जाऊ शकते हे समजून घेणे देखील गरजेचे आहे.
प्रौढांप्रमाणे कौशल्य बजावण्याऐवजी ते शिकत असलेल्या कौशल्याच्या पुढील आवृत्तीकडे जाण्याचे पालकांचे लक्ष्य असले पाहिजे. मुलांसमवेत काम करणा-यांना कौशल्ये शिकण्याच्या अवस्थांशी परिचित असणे देखील आवश्यक असल्याचे श्री केदार यांनी सांगितले. या वेबिनार मध्ये प्रास्ताविक भाषणांमधून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अंजली ठाकरे यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि या वेबिनार बद्दल संपूर्ण माहिती तसेच शारीरिक साक्षरता मागचा हेतू उद्देश समजावून सांगितले.

****

वाढीव गुणासाठी प्रस्ताव सादर करण्यास 25 जून पर्यंत मुदतवाढ


वाढीव गुणासाठी प्रस्ताव सादर करण्यास
25 जून पर्यंत मुदतवाढ 
               
अमरावती, दि. 17 :  शैक्षणिक वर्ष  2019-20 मधील शालेय खेळाडू, एन.सी.सी. आणि स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय मंडळ कार्यालयाकडे  सादर करण्यास  दिनांक 25 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मार्च 2020 मधील इयत्ता 10 वी 12 वी मध्ये प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करण्यास 20 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत वाढ केवळ 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरीता लागू राहील. केाणताही पात्र विद्यार्थी या गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी  दक्षता घ्यावी ,असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

गुरुवार, ४ जून, २०२०

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू



जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि.04 : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार  मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यामध्ये प्रभावी उपाययोजना करण्याकरिता रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 1 जून ते 16 जून 2020 पर्यत कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
000000




मंगळवार, २ जून, २०२०

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता









जिल्हा माहिती कार्यालय अमरावती
महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या प्रयत्नाने सापडला मूक महिलेचा पत्ता
पत्ता न सांगता येणारी मूक भगिनी स्वगृही रवाना
आधार प्रणालीची मदत
मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या व येथील जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या एका भगिनीची व्यथा जाणून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यांच्या सतत प्रयत्नाने आधार प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून, या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
या भगिनीचे नाव के. मंजुळा असून, त्या आंध्रप्रदेशातील आहेत. आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील त्या रहिवाशी आहेत. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी साडीचोळी देऊन या भगिनीला निरोप दिला. तिच्या गत महिनाभरातील वास्तव्याने स्नेह निर्माण झालेल्या पारिचारिका भगिनींना व सर्वांना के. मंजुळा यांनी हात हलवून निरोप दिला. घरी परतण्याचा आनंद त्यांचा चेह-यावर झळकत होता. पालकमंत्र्यांसह सगळेच यावेळी भारावून गेले होते.
सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलीसांना आढळले. ती मूक असल्याने संवाद होत नव्हता. प्रशासनाने तिला क्वारंटाईन कक्षात दाखल केले. दरम्यान, या महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इर्विन रूग्णालयात दि. ६ मे रोजी १०८ रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.
उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकला नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेऊन दिलासा दिला.
दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिकांनी तिची काळजी घेतली.
बोटांच्या ठस्यांच्या आधारे आधार प्रणालीतून शोध
या भगिनीच्या हातवा-यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीचा डेटा तपासून त्याआधारे शोधून काढण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. त्यानुसार यंत्रणेकडूनही शोध मोहिम सुरूच होती. महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर रोज त्याचा पाठपुरावा करत होत्या. त्यानुसार या अविरत प्रयत्नांना अखेर यश मिळाले.
आधार प्रणालीच्या साह्याने हातांच्या ठस्याच्या आधारे या महिलेचा पत्ता सापडला. त्यावेळी मंत्री श्रीमती ठाकूर यांच्यासह प्रशासन, जिल्हा रूग्णालयातील स्टाफ यांनी आनंद व्यक्त केला. आप्तस्वकीयांच्या आठवणीने रोज अश्रू ढाळणा-या या भगिनीपर्यंत ही पारिचारिकांनी ही माहिती सांकेतिक खुणांनी पोहोचवली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिला पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून कुर्नुल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्या. या भगिनीसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले. तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष तसरे, नीरज तिवारी, पंकज मुदगल अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता.
या मूक भगिनीला तिच्या घरापर्यंत पोहोचून कुटुंबिय व आप्तांना भेटता येणार आहे, याचा मोठा आनंद आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी हरप्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत, असे महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. के. मंजुळा यांचा पत्ता मिळेपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना जिल्हा रूग्णालयातच ठेवले होते. या काळात त्यांची व इतरही रुग्णांची अविरत सेवा करणा-या सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांचे व शोध मोहिमेला सहकार्य करणा-या प्रत्येकाचे श्रीमती ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.