बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा, मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

 सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा मेळघाटात दोन दिवस दौरा

मंत्री डॉ. तानाजीराव सावंत करणार आरोग्य केंद्रांची पाहणी

 

        अमरावती, दि. 28 (विमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे दि. 2 व 3 डिसेंबरला मेळघाट दौ-यावर असून, ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची पाहणी करणार आहेत.

            त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने अचलपूरकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु. 12 वा. अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे प्रयाण, दु. 12.30 वाजता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आगमन व भेट, दु. 1 वाजता बिहालीकडे प्रयाण, दु. 2 वा. बिहाली उपकेंद्र येथे आगमन व भेट, दु. 2.30 वाजता उपकेंद्र बिहाली येथून सलोनाकडे प्रयाण, दु. 3 वाजता सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आगमन व भेट, दु. 3.45 वाजता आमझरीकडे प्रयाण, दु. 4 वाजता आमझरी उपकेंद्र येथे भेट. दु. 4.30 वा. चिखलद-याकडे प्रयाण, सायं. 5 वाजता चिखलदरा ग्रामीण रुग्णालय येथे भेट, सायं. 6 वा. चिखलदरा येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सायं. 6.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चिखलदरा येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वा. सेमाडोहकडे प्रयाण, सकाळी 8.45 वाजता सेमाडोह प्रा. आ. केंद्र येथे भेट, स. 9.30 वाजाता हरिसालकडे प्रयाण, सकाळी 10 वा. हरिसाल प्रा. आ. केंद्र येथे भेट, सकाळी 10.30 वाजता धारणीकडे प्रयाण, सकाळी 11 वा. धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट, स. 11.30 वाजता अचलपूरकडे प्रयाण, दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह, अचलपूर येथे आगमन व राखीव. दु.  3 अमरावती विभागीय कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 4.30 विभागीय आयुक्त कार्यालयात अमरावती महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायं. 5 वाजता अमरावती येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण.

 

00000

‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन

 ‘आयटीआय’मध्ये आज संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन  

अमरावती, दि. 29 - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील  विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण मॉडेल्सची निर्मिती व प्रोत्साहनासाठी संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शन उद्या दि. 30 नोव्हेंबर रोजी  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.

याच उपक्रमाचे विस्तारित स्वरूप म्हणून दि. 2 डिसेंबरला जिल्हास्तरीय प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  

राज्याचे संचालक दिगंबर दळवी यांच्या पुढाकाराने व अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले यांच्या मार्गदर्शनानुसार कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे व संस्थेचे प्राचार्य संजय बोरकर यांनी केले आहे.

यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वीजतंत्री, वेल्डिंग, टीडीएम,आयटी आदी अभियांत्रिकी व्यवसायातील, तसेच ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कोपा यासारख्या बिगर अभियांत्रिकी व्यवसायाच्या  प्रशिक्षणार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून अनेक मॉडेल तयार केले आहेत. ते प्रदर्शनात पहावयास मिळतील. प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बोरकर व उपप्राचार्य राजेश चुलेट यांनी केले आहे.

०००

आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम, जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

 आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम

जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट

 

आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे सातत्यपूर्ण कार्य

 

अमरावती, दि. 30 : शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गत 15 वर्षांत जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरामध्ये घट झाली आहे. यंदा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे.    

 

प्रभावी लोकशिक्षण, उपचार, सुरक्षितता साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. ते म्हणाले की, 2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. प्रभावी जनजागृतीमुळे नागरिक तपासण्यांसाठी केंद्रांवर येण्याचे प्रमाण वाढले. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 1.71 टक्के होते. 2017-18 मध्ये एक लाख 30 हजार 255 व्यक्तींच्या तपासणीत 388 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.30 टक्के होते. 2021-22 मधील एक लाख 36 हजार 189 तपासण्यांमध्ये 246 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.18 टक्के इतके आहे.

शासकीय रूग्णालयांत विनामूल्य उपचार

एचआयव्ही नियंत्रण व उपचारासाठी अमरावती जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय, चार उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालये, 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक क्षयरोग उपचार रुग्णालय, 59 खाजगी रुग्णालये, दोन गुप्तरोग केंद्रे, एक शासकीय रक्तपेढी, चार खाजगी रक्तपेढी एवढी यंत्रणा काम करते. या सर्व ठिकाणी एड्सविषयी माहिती व एचआयव्ही तपासणीच्या  विनामूल्य सुविधा पुरविल्या जातात. मोफत उपचारासाठी शासकीय, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांत एआरटी केंद्रे सुरू आहेत.

संक्रमितांना एआरटी केंद्र येथे पोहोचवून आवश्यक तपासण्या, सीडी-फोर तपासणी व विनामूल्य उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 51 हजार 467 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा गर्भवती मातांना एआयव्हीची लागण झाल्याचे आढळले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात एकूण 17 एचआयव्ही संक्रमित गरोदर मातांची शासकीय रुग्णालयात यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाच्या सुरक्षिततेसाठी नेविरेपिन औषध देण्यात आले. ग्रामीण व शहरी क्षयरोग विभागाच्या सहकार्याने प्रत्येक क्षयरूग्णाची एचआयव्ही तपासणी करण्यात येऊन तसे आढळल्यास त्यांना आवश्यक औषधोपचार दिले जातात.

        स्वयंसेवी संस्थांची भक्कम साथ

शासकीय आरोग्य यंत्रणेच्या या कार्याला स्वयंसेवी संस्थांचीही भक्कम साथ लाभली आहे. जिल्ह्यात स्थलांतरित कामगारांसाठी भाग्योदय बहुद्देशीय संस्था कार्य करत आहे. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संस्था गावपातळीवर लिंक वर्कर कार्यक्रमात 100 गावांसाठी तपासणी व समुपदेशन करत आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांमध्ये एचआयव्हीच्या प्रसाराची माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्यही ही संस्था करत आहे. त्याचबरोबर, संत सत्यदेवबाबा महिला मंडळ संस्था ही संस्थाही या कार्यात अग्रेसर आहे. आधार संस्थेच्या वतीने संक्रमित बांधवांना सामाजिक, मानसिक व आर्थिक साह्य मिळण्यासाठी विविध शासकीय योजना व सेवासुविधा पोहोचविण्याचे कार्य केले जाते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ट्रकचालक, क्लीनर बांधवांमध्ये माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्य होत आहे. समर्पण संस्थेतर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्य होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या  संयुक्त विद्यमाने विविध महाविद्यालयांत 78 रेड रिबन क्लब काम करतात. त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रॅली, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एड्स स्लोगन (घोषवाक्य)स्पर्धा आयोजित केल्या जातात.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि. एक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृती रॅली काढण्यात येईल. त्याचप्रमाणे, दि. तीन डिसेंबर रोजी पब्लिक फोरम कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी व नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले.

०००

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे





पावसावर अवलंबित कृषीप्रणालीत बदलासाठी सर्वकष प्रयत्न आवश्यक

-         विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. 22 : पावसावर अवलंबून असलेल्या कृषी प्रणालीत विकास घडवून आणण्यासाठी विविध योजनांची सांगड घालून सर्व विभागांनी संघटीत व सर्वकष प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले.

विभागीय आयुक्तालयात पश्चिम विदर्भात पावसावर अवलंबून असलेल्या शेतीप्रणालीबाबत कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरआरए नेटवर्कचे राज्य समन्वयक सजल कुलकर्णी तसेच विभागातील पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि, मनरेगा, आदिवासी विकास विभाग, जलसंधारण, वने, पशुसंवर्धन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी संशोधनात महाराष्ट्र अव्वल राज्य असला तरीही प्रत्यक्षात बहुतांश शेती अद्यापही मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी केवळ खरिप पिके घेऊ शकतात. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 37.05 टक्के कुटुंबे शेतीवर व 44.37 टक्के कुटुंबे शेतीविषयक मजूरी कामांवर अवलंबून आहेत. त्यातही दोन हेक्टरहून कमी जमीन असलेल्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पावसाधारित शेती पध्दतीत सुधारणा अत्यावश्यक आहेत. त्यात बहुविध पिकपध्दती, शेतमाल विपणन, पूरक व्यवसायांबरोबरच कृषी उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ. पांढरपट्टे यांनी दिले.

पश्चिम विदर्भातील शेतकरी अद्यापही पावसाधारित शेतीवर, वनाधारित उत्पादनांवर अवलंबून आहेत. त्यात विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र आरआरए नेटवर्क या संस्थेने प्रकल्प हाती घेतला आहे. त्याव्दारे शेती विषयक सुधारणांसाठी उपाययोजना राबविणे, शेतीवर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे जीवनमान उंचावणे, सर्व शासकीय संबंधित विभागांचा समन्वय ठेवणे, योजनांमधील त्रुटी दूर करणे, परिस्थितीनुरूप बदल घडवणे व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आदी कामे करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. कुलकर्णी यांनी दिली.

0000

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत

आदिवासी लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित  

 

अमरावती, दि. 21 :  धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजने (न्युक्लिअस बजेट) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी अनुसूचित जमातीच्या नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त कार्यालयात योजनांचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध असून आदिवासी बांधवांनी संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

त्यानुसार धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाथार्थ्यांनी धारणी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे. नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे तसेच मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूरबाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी धारणी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोर्शी उपकार्यालयाला योजनेंतर्गत अर्ज सादर करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 07226-224217 यावर संपर्क साधावा. योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे :

गट-अ योजनेत आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन संचाचा 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी शेतकरी समुहांना पिकांच्या व शेतीच्या संरक्षणाकरीता तारजाळी 85 टक्के अनुदानावर पुरवठा करणे, आदिवासी बचत गटांना ग्रामोद्योग उभारणीकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे, आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर टरबुज लागवड करण्याकरीता अर्थसहाय्य करणे आदी योजनांचा समावेश असून त्यानुसार लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे.

तसेच गट-ब योजनेत आदिवासी युवक-युवतींना मराठी, इंग्रजी टंकलेखनाचे एकत्रित प्रशिक्षण (अनिवासी) देणे, आदिवासी युवक-युवतींना एमएससीआयटीचे प्रशिक्षण (अनिवासी) देणे, आदिवासी महिला गटाच्या सदस्यांना दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ बनावण्याचे प्रशिक्षण (निवासी) देणे, आदिवासी युवक- युवतींना स्पर्धा परीक्षापुर्व प्रशिक्षण देणे, आदिवासी बचत गटातील महिलांना टिंबर आणि बांबू कलेचे प्रशिक्षण देणे आदी योजनांचा समावेश त्यानुसार लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे.

उपरोक्त योजनांच्या लाभाकरीता शासन निर्णयानुसार प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल, लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या, निराधार महिला आदींना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

0000000

 

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

 

आव्हानांचा स्वीकार सकारात्मकतेने करा

 

स्पर्धेत यश मिळवितांना…परिसंवादाचा सूर

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : अमरावती जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय मराठी ग्रंथालयात आयोजित ‘जिल्हा ग्रंथोत्सवा’त आज ‘स्पर्धेत यश मिळवितांना’ या विषयावर परिसंवादचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस उपायुक्त विक्रम साळी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार मदन जाधव यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी स्वानुभवातून मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. साळी म्हणाले की, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्वयंप्रेरित असणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करतांना इतरांशी स्वत:ची तुलना करु नका. कालपेक्षा आज आपली काय प्रगती झाली, याबाबत स्वत:शी  संवाद साधा. परीक्षा देतांना आव्हानांचा स्वीकार आनंदाने आणि सकारात्मकतेने करा. वाचन केवळ परीक्षेच्या यशप्राप्तीपुरतेच न ठेवता ही सवय आयुष्यभर अंगिकारा. ज्या पदावर तुमची नियुक्ती झाली आहे, त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी निरपेक्ष वृत्ती स्वत:मध्ये रुजवा. ध्येय निश्चिती आणि सकारात्मकतेमुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविणे कठीण नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करावे. समाज माध्यमांचा अगदी जुजबी वापर करावा. आज सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे आपले प्रयत्न इतरांपेक्षा सरस ठरतील, यासाठी अविरत प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे. स्वत:ची टिपणे काढा. बाजारात तयार साहित्यांवर विसंबून राहू नका. अपयशाने खचून न जाता सकारात्मक वृत्ती बाळगा. प्रबळ इच्छाशक्ती, चौफेर वाचन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाहीत, असे मत श्रीमती वर्षा भाकरे यांनी व्यक्त केले.

आपले इच्छित ध्येय गाठेपर्यंत विश्रांती घेऊ नका. समाजमाध्यमांच्या वापराबाबत स्वत:वर निर्बंध लादा. तुम्हीच तुमचे परीक्षक व्हा. ज्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण मिळवू शकाल, त्यावेळी स्पर्धेत यश मिळविणे कठीण नाही. बदलांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा. अवांतर वाचनासह संदर्भग्रंथांचे वाचन वाढवा. दैनंदिन वृत्तपत्रांच्या नोंदी घ्या. अनावश्यक वेळ कुठेही खर्च होणार नाही, यांची दक्षता घ्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आनंदाने स्वीकारा. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही रोजची आव्हाने संपत नाही. यासाठी केवळ स्पर्धेपुरतेच नाही तर यशस्वी आयुष्य जगण्यासाठी शरीरासह मनाचीही मशागत करा. अपयश आल्यास खचून जावू नका. तर उपलब्ध दुसऱ्या पर्यायाकडे वळण्याचा संदेश मदन जाधव यांनी दिला.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांगदे यांनी केले. विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी तसेच विद्यार्थी, ग्रंथप्रेमी, साहित्यरसिक, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते. 

00000

 

अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्पर्धेत यश मिळवताना, परिसंवाद (ग्रंथ माझा सांगांती),

इरसाल नमुने व समारोप कार्यक्रमांची मेजवानी

 

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला.

तसेच उद्या शनिवारी (दि. 19 नोव्हेंबरला) ‘स्पर्धेत यश मिळवताना…’ या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, ‘ग्रंथ माझा सांगांती’ या विषयावर परिसंवाद तसेच मंगेश ठाकरे यांचा इरसाल नमुने’ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी तसेच आयोजकांनी केले आहे.

            वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होत असून शासकीय विभागीय ग्रंथालय, मोर्शी रोड याठिकाणी ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी विविध प्रकाशकांचे ग्रंथ, नामांकित लेखकांची, स्पर्धा परिक्षांची तसेच शासकीय मुद्रण व ग्रंथागार आदींच्या पुस्तकांचे दहा स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. या संधीचा जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी व आयोजकांनी केले आहे.

00000

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे

ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ  

 अमरावती, दि. 17 (विमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची मुदत यापूर्वी दिनांक दि. ५ नोव्हेंबर रोजी संपली होती. तदनंतर दि. १५ नोव्हेंबर .२०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु, आवेदनपत्र भरण्याच्या संकेतस्थळामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने चार-पाच दिवस इयत्ता बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन भरता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्व्या हितासाठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे. तपशील पुढीलप्रमाणे -

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्याथ्र्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम HSC vocational Stream शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेन्दारे Transfer of Creditघेणारे विद्यार्थी विद्याध्यांची नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या मुदतवाढीच्या तारखा व विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांचा नियमित शुल्क दि. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ व विलंब शुल्कासह दि. २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राहील.  उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरावयाची मुदत दि.२ डिसेंबर २०२२ पर्यंत राहिल.

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGSद्वारे भरणा केल्याच्या RTGS/NEFT / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख बुधवार, दि. ७ डिसेंबर आहे. यामध्ये कोणताही बदल नाही याची नोंद घ्यावी. नियमित शुल्काने तसेच विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखां यथावकाश कळविण्यात येतील. सदरची बाब विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून कार्यकक्षेतील सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व सर्व संबंधित घटकांच्या निदर्शनास आणावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

०००००

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

अमरावती, दि. 17 (विमाका) :  अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांत प्रधानमंत्री पिक विमा योजना यावर्षीच्या रब्बी हंगामात राबविण्यासाठी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ही योजना खरीप-2022 व रब्बी/उन्हाळी 2022-23 हंगामाकरिता कप ॲन्ड कॅप मॉडेलनुसार Cup & Cap model (80:110) राज्यात राबविण्यात येत आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत रब्बी पिक ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर २०२२ राहील तर बा.गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी १५ डिसेंबर २०२२ व उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुंग ३१ मार्च २०२३ आहे.

अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिककर्ज घेतल्यास शेतक-यांना या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र, त्यासाठी शेतक-याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतीम दिनांका आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळविणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतक-यांनी आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेवून अधिकृत बँकेत विमा अर्ज देवून व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती शेतक-यांनी जपुन ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) आपले सरकारचे मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेवु शकता. www.pmfby.gov.in या पोर्टलवर माहिती सुरु आहे. या वर्षीच्या रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक के. एस. मुळे यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकयांचे आर्थिक स्थैर्य अवधित राखणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे आदीप्रमाणे योजनेचा उद्देश असून  गहू, हरभरा, कांदा व उन्हाळी भुईमुंग ही पिके या रब्बी हंगामात समाविष्ठ आहेत.

बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनीकडून विमा दिली जाणार असून तीचा पत्ता मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई, ई-मेल- pilvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक १८००४१९५००४ असा आहे. तसेच अकोला जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. विमा कंपनी नेमून दिली असून तीचा पत्ता माणिकचंद आयकॉन, ३ रा मजला, प्लाट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन, पुणे, ई-मेल- customersupportba@icicilombard.com टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ असा आहे.

या योजनेंतर्गत राज्यात सन २०२२-२३ साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दराप्रमाणे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली असून जिल्हानिहाय पिकनिहाय विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे-

बुलढाणा जिल्ह्यासाठी गहु पिकासाठी ७१२.९२ प्रती हेक्टरी विमाहप्ता दर, हरभरा पिकासाठी ५८१.२५, रब्बी कांदा पिकासाठी ४७५७.८० राहील. अकोला जिल्ह्यात गहु ६३०, हरभरा ४३२, रब्बी कांदा ४३८०, उन्हाळी भुईमुंग ६४४.५७, वाशिम जिल्ह्यात गहु ६३०, हरभरा ४३२, रब्बी कांदा निरंक, उन्हाळी भुईमुंग ६४४.५7, अमरावती जिल्ह्यात गहु ६००, हरभरा ५७०, रब्बी कांदा ३४००, उन्हाळी भुईमुंग ६४४.५७ तर यवतमाळात गहु ६०७.८०, हरभरा ५८८.२७, रब्बी कांदा निरंक, उन्हाळी भुईमुंग ६४४.५७ याप्रमाणे प्रती हेक्टरी विमा दर पिकनिहाय निश्चित करण्यात आले आहे.

 

योजनेचे वैशिष्ट्ये :-

प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत शेतकनऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम सन २०२२-२३ या एका वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. यावर्षी काही पिकांमध्ये महसुल मंडळामधील पिकांचे सरासरी उत्पादन नोंदवितांना रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनास १० टक्के भारांकन आणि पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ९० टक्के भारांकन देवून मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. ई-पिक पाहणी शेतक-यांनी लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पिक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतीम गृहीत धरण्यात येईल, अशाप्रमाणे योजनेचे वैशिष्ट्ये आहेत.

 

पिक संरक्षणाच्या बाबीं :

योजनेंतर्गत जोखमींची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणारी घट, पिक पेरणी/लावणीपूर्व नुकसान- यात पुराचा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकुल घटकामुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होवु शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत पुर, पावसातील खंड व दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतक-याच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्यांहून अधि घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे. काढणी पश्चात चक्रीवादळ व अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरुन ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झ्याल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. (युध्द व अणु युध्दाचे दुष्परिणाम, हेतु पुरस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्या जोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही) काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखमी अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्वे. नं. नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासुन ७२ तासाचे आत संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक राहील.

0000

भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती

 

भूमि अभिलेख विभागात सरळसेवेने पदभरती

28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा

उमेदवारांच्या सुलभतेसाठी https://mahabhumi.gov.in संकेतस्थळ

 

अमरावती, दि. 17 (विमाका) :  भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test)  दि. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंकदेखील दि. १४ नोव्हेंबरपासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. याची सर्व परीक्षार्थींना नोंद घ्यावी, असे उपसंचालक (भूमि अभिलेख) विलास शिरोळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभिमुखता व प्रेरणा कार्यक्रम संपन्न

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात

माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभिमुखता व प्रेरणा कार्यक्रम संपन्न

 

अमरावती, दि. 10 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच (दि. 4 नोव्हेंबर) माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संमारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरीता अभिमुखता व प्रेरणा (ओरिएन्टेशन व इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेतील यशस्वी माजी विद्यार्थ्यांपैकी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली कु. पल्लवी चिंचखेडे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात राज्यस्तरीय कृषी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे स्टार्टअपचा बहुमान राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थी परशुराम आखरे आणि शैक्षणिक तथा सामाजिक उपक्रम राबवून नामांकित पारितोषिक पटकविणारा प्रणव सोनटक्के आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेचे नावलौकिक झाले आहे. याप्रसंगी संस्थेत प्रथम वर्षांत नविन प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता ओरिएन्टेशन व इंडक्शन कार्यक्रमही घेण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व सत्कारमुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले. ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या प्रती प्रखर जिद्द आपल्यामध्ये असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण कु. पल्लवी चिंचखेडे यांनी केले. युवकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकाभिमुख स्टार्टअप सुरु करायला हवे, असे श्री. आखरे यावेळी म्हणाले. स्वत:च्या बळावर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे. आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात, असे श्री. सोनटक्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविण्यास माजी विद्यार्थ्यांचा महत्वपूर्ण वाटा असून, संस्थेतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुध्दा यशस्वी विद्यार्थ्यांप्रमाणे प्रगती करावी, असे आवाहन श्री. महल्ले यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रवेशासंदर्भात डॉ. डी. ए. झटाले यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून अल्यूम्नी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी एअर कमांडर प्रमोद वानखडे, संजय कांडलकर. विजय धोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अध्यापकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एम. व्हि. जपे, प्रभारी अधिकारी, विद्यार्थ्यी कल्याण , डॉ. डी. ए. झटाले, प्रथम वर्ष समन्वयक तसेच संस्थेतील अध्यापक व कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.

0000

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशास 21 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ

 महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशास 21 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ

 

                अमरावती दि.4 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज दि. 7 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले होते. सदर मुदत संपुष्टात आल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास दि. 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणेचे प्र.सचिव माणिक बांगर यांनी केले आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे-

            दि. 8 ते 21 नोव्हेंबरपर्यंत (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 25 नोव्हेंबरपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात सादर करावे.

उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-scc.ac.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासंबंधीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत, असे मंडळाव्दारे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

माझा एक दिवस बळीराजासाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

 माझा एक दिवस बळीराजासाठी

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

अमरावती, दि. ७ -  कृषी विभागाच्या माझा एक दिवस बळीराजा या उपक्रमात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी देवरा येथे शेतकरी बांधवाच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी आज संवाद साधला. देवरा येथील शेतकरी बांधवांच्या अडचणी  जाणून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.

उपक्रमात अशोकराव कडू यांच्या घरी भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी त्यांच्याशी कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना येणा-या अडचणी जाणून घेतल्या, तसेच, पीकपद्धती, उत्पन्न, पशुधन आदी बाबींची माहिती घेतली. शेतकरी बांधवांना येणा-या अडचणींचा तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या वनराई बंधा-याचे जलपूजन जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाले. तसेच बीजप्रक्रियेबाबत शेतकरी बांधवांना माहिती देण्यासाठी यंत्राद्वारे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

 गावाच्या सरपंच मनीषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी,  जिल्हा कृषी विकास अधिकारी गोपाळराव देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, कृषी विज्ञान केंद्राचे श्री. कळसकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गावातील सभागृहात जिल्हाधिका-यांच्या उपस्थिती
















त सभा झाली. यावेळी शेतकरी बांधवांशी बोलताना श्रीमती कौर म्हणाल्या की, शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गावात गोदाम निर्माण करण्याची मागणी होत आहे. देवरा हे गाव पोकरा योजनेत समाविष्ट नाही. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. गावानजिक पेढी नदीचे आवश्यक तिथे खोलीकरण करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल, तसेच कायमस्वरूपी बंधाराही निर्माण करण्यात येईल. अवजार बँकेसारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. गावक-यांच्या मागणीनुसार रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

खारपाणपट्ट्यातील तूर व हरभरा डाळ वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न होत आहेत. विविध योजनांद्वारे गावात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू होण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले. उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके यांनी प्रास्ताविक केले. तंत्र व्यवस्थापक रूपाली चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

०००

 

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

 

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या  

परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

www.mahahsscboard.in संकेतस्थळ उपलब्ध

30 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे सादर करा 

अमरावती, दि. 7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे भरावयाची मुदत दि.5 नोव्हेंबर रोजी संपल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनपत्रे  भरण्यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे. तपशील पुढीलप्रमाणे-

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्कासह दि. 6 ते दि. 15 नोव्हेंबर दरम्यान तर विलंब शुल्कासह दि. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम (HSC vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आदी शाखांचे विद्यार्थी इयत्ता बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतात.

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा केल्याच्या RTGS/NEFT पावती/ चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख दि. 7 डिसेंबर आहे. परीक्षा शुल्काची खातरजमा लेखा शाखेने करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ राज्य मंडळास सादर करावा.

            सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमीट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज Login मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर प्रिलिस्ट परीक्षा फी चलन व विद्यार्थी यादीसोबत विभागीय मंडळाकडे जमा करावी.

इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात. तपशीलाप्रमाणे विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या बँकेमध्ये मध्ये RTGS/NEFT द्वारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. पुणे, औरंगाबाद व कोल्हापूरसाठी- Bank of India Virtual Account, मुंबई, नागपूर व लातूरसाठी - HDFC Bank Virtual Account, अमरावती, नाशिक व कोकण साठी :- AXIS Bank Virtual Account

आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download चलनावरील Virtual Account मध्ये NEFT / RTGSव्दारे भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी NEFT/RTGS भरत केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Numbers, IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील.

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. सदर बाब सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दयावी.

 उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा विभागीयस्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येतील. आवेदनपत्रे SARAL Database वरून Save होत नसल्यास त्यांनी उपरोक्त दिलेल्या मुदतीत All Application च्या लिंकवरून आवेदन भरावयाची आहेत.

नियमित विलंब शुल्क स्वर RTGS/NEFT द्वारे भरण्यात यावे. नियमित शुल्क, आवेदनपत्रे भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

०००००