महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या
इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशास 21 नोव्हेंबरपर्यत मुदतवाढ
अमरावती दि.4 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज दि. 7 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले होते. सदर मुदत संपुष्टात आल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास दि. 21 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणेचे प्र.सचिव माणिक बांगर यांनी केले आहे. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे-
दि. 8 ते 21 नोव्हेंबरपर्यंत (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज भरता येईल. विद्यार्थ्यांनी दि. 10 ते 23 नोव्हेंबरपर्यंत मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जामध्ये नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. तसेच दि. 25 नोव्हेंबरपर्यंत संबंधित संपर्क केंद्र असलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात सादर करावे.
उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा