फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या
परीक्षेची आवेदनपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ
www.mahahsscboard.in संकेतस्थळ उपलब्ध
30 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे
सादर करा
अमरावती, दि. 7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात
येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ इयत्ता बारावीच्या परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या
सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे भरावयाची मुदत दि.5
नोव्हेंबर रोजी संपल्यामुळे विद्यार्थी हिताच्यादृष्टीने परीक्षेची ऑनलाईन
आवेदनपत्रे भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन
आवेदनपत्रे भरण्यासाठी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा
ओक यांनी कळविले आहे. तपशील पुढीलप्रमाणे-
उच्च
माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित
विद्यार्थ्यांची परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पध्दतीने
नियमित शुल्कासह दि. 6 ते दि. 15 नोव्हेंबर दरम्यान तर विलंब शुल्कासह दि. 16
नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ
महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरावयाची मुदत दि. 2 डिसेंबर आहे.
व्यवसाय
अभ्यासक्रम (HSC vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे
पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी,
श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे
Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आदी शाखांचे विद्यार्थी इयत्ता बारावीच्या
परीक्षेस प्रविष्ठ होऊ शकतात.
उच्च
माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा केल्याच्या
RTGS/NEFT पावती/ चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख
दि. 7 डिसेंबर आहे. परीक्षा शुल्काची खातरजमा लेखा शाखेने करून त्याबाबतचा अहवाल
तात्काळ राज्य मंडळास सादर करावा.
सर्व विद्यार्थ्यांची
आवेदनपत्रे भरून सबमीट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज Login मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल,
कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती
जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर
माहितीची खात्री केल्याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर
सदर प्रिलिस्ट परीक्षा फी चलन व विद्यार्थी यादीसोबत विभागीय मंडळाकडे जमा करावी.
इयत्ता
बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने
विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील
प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात
घ्याव्यात. तपशीलाप्रमाणे विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या बँकेमध्ये मध्ये
RTGS/NEFT द्वारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्याच्या याद्या व प्रिलिस्ट
दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. पुणे, औरंगाबाद व
कोल्हापूरसाठी- Bank of India Virtual Account, मुंबई, नागपूर व लातूरसाठी - HDFC
Bank Virtual Account, अमरावती, नाशिक व कोकण साठी :- AXIS Bank Virtual Account
आवेदनपत्रे
सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download चलनावरील
Virtual Account मध्ये NEFT / RTGSव्दारे भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांनी NEFT/RTGS भरत केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष
वजा झाली आहे किंवा नाही तसेच Account Numbers, IFSC Code चुकीचा नमूद केला
गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची
जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील.
उच्च
माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
सदर बाब सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दयावी.
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांनी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा
विभागीयस्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ
कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येतील.
आवेदनपत्रे SARAL Database वरून Save होत नसल्यास त्यांनी उपरोक्त दिलेल्या मुदतीत
All Application च्या लिंकवरून आवेदन भरावयाची आहेत.
नियमित
विलंब शुल्क स्वर RTGS/NEFT द्वारे भरण्यात यावे. नियमित शुल्क, आवेदनपत्रे
भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी
नोंद घ्यावी. अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात
येतील, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा