सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

अमरावती ग्रंथोत्सवात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्पर्धेत यश मिळवताना, परिसंवाद (ग्रंथ माझा सांगांती),

इरसाल नमुने व समारोप कार्यक्रमांची मेजवानी

 

 

अमरावती, दि. 18  : ग्रंथदिंडी, कवी, लेखक, रसिक, वाचकांची मांदियाळी, वाङमय चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या अमरावती जिल्हा ग्रंथोत्सवाचा शुभारंभ आज झाला.

तसेच उद्या शनिवारी (दि. 19 नोव्हेंबरला) ‘स्पर्धेत यश मिळवताना…’ या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, ‘ग्रंथ माझा सांगांती’ या विषयावर परिसंवाद तसेच मंगेश ठाकरे यांचा इरसाल नमुने’ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण व समारोपीय कार्यक्रम होणार आहे. ग्रंथप्रेमी आणि नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सुरज मडावी तसेच आयोजकांनी केले आहे.

            वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘ग्रंथोत्सव’ राबविण्यात येत असून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. लेखक, वाचक आणि प्रकाशक या त्रिवेणी संगमातून संस्कारक्षम विचार करणारी पिढी तयार होत असून शासकीय विभागीय ग्रंथालय, मोर्शी रोड याठिकाणी ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमस्थळी नागरिकांसाठी विविध प्रकाशकांचे ग्रंथ, नामांकित लेखकांची, स्पर्धा परिक्षांची तसेच शासकीय मुद्रण व ग्रंथागार आदींच्या पुस्तकांचे दहा स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. या संधीचा जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी व आयोजकांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा