सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे

ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ  

 अमरावती, दि. 17 (विमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ठ होवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची मुदत यापूर्वी दिनांक दि. ५ नोव्हेंबर रोजी संपली होती. तदनंतर दि. १५ नोव्हेंबर .२०२२ पर्यंत वाढविण्यात आली होती. परंतु, आवेदनपत्र भरण्याच्या संकेतस्थळामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने चार-पाच दिवस इयत्ता बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन भरता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्व्या हितासाठी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे. तपशील पुढीलप्रमाणे -

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची नियमित विद्याथ्र्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम HSC vocational Stream शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेन्दारे Transfer of Creditघेणारे विद्यार्थी विद्याध्यांची नियमित शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या मुदतवाढीच्या तारखा व विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांचा नियमित शुल्क दि. ६ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ व विलंब शुल्कासह दि. २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राहील.  उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन काढून शुल्क बँकेत भरावयाची मुदत दि.२ डिसेंबर २०२२ पर्यंत राहिल.

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGSद्वारे भरणा केल्याच्या RTGS/NEFT / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख बुधवार, दि. ७ डिसेंबर आहे. यामध्ये कोणताही बदल नाही याची नोंद घ्यावी. नियमित शुल्काने तसेच विलंब शुल्काने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखां यथावकाश कळविण्यात येतील. सदरची बाब विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून कार्यकक्षेतील सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख व सर्व संबंधित घटकांच्या निदर्शनास आणावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा