मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन

 

‘सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ स्पर्धेचे आयोजन

 

 

अमरावती, दि. 1 : विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी नवीन अभ्यासक्रम निवडावा, अशी अभिनव कल्पना राज्य सरकारने समोर आणली आहे. त्यानुसार शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत "सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

त्यानुसार दि. 01 ते 15 नोव्हेंबर दरम्यान उपरोक्तप्रमाणे स्पर्धा घेण्यात घेईल. या स्पर्धेत शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येईल. यासाठी वयाची अट नाही. शेती व्यवसाय क्षेत्र, स्वयंरोजगार क्षेत्र, महिला रोजगार क्षेत्र, उपयुक्त आधुनिक तंत्रज्ञावर आधारित अभ्यासक्रम, अन्य उपयुक्त अभ्यासक्रम आदी विषयांबाबत विद्यार्थ्यांना सूचना करता येईल.

सुचवलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाला का सुरु करावे, याची सबळ कारणे सादरीकरणाच्यावेळी द्यावी लागतील. प्रत्येक तालुक्यातुन एक विद्यार्थी निवडला जाईल. त्यांची जिल्हास्तरावर स्पर्धा होईल. सर्वोत्तम तीन संकल्पना निवडल्या जातील. अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल. स्पर्धेत ऑनलाईन सहभागी होता येईल. या स्पर्धेबाबतची अधिक माहिती नजीकच्या शासकिय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहाय्यक संचालक आर. एम. लोखंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा