इयत्ता दहावी व बारावीच्या
विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती अनिवार्य
अमरावती, दि.
1 : महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या
फेब्रुवारी/मार्च 2023 च्या माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या
नियमित विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रत्येक सत्रात 75 टक्के असणे अनिवार्य आहे.
त्यानुसार
संबंधित शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्य/मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळा,
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
तसेच विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती संदर्भात शिक्षक, विद्यार्थी, पालक
यांच्या सदर बाब निदर्शनास आणून द्यावी, असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव
उल्हास नरड यांनी प्रकटनद्वारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा