महिलांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी
‘महिला लोकशाही दिना’चे आयोजन
अमरावती,
दि. 11 : महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार समस्याग्रस्त पिडीत महिलांना
त्यांचे प्रश्न मांडण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण
होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडविण्यासाठी
महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या
दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर, तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर तर
चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येईल.
या
माध्यमातून समस्याग्रस्त व पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार
असून याचा विभागातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने विभागीय
उपआयुक्त विलास मरसाळे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा