महाज्योतीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा
अमरावती दि. 9: तुमच्या स्वप्नांना सांगू नका, तुम्हाला किती अडचणी आहेत, पण अडचणीनां अवश्य सांगा की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत. महाज्योती आपणा सर्वांच्या विकास ध्येयाचे स्वप्न आहे. जे साकार होत आहे. अनेक अडचणीवर मात करुन आपण समोरे जात आहोत. स्व:ला सिध्द करीत आहोत. यशस्वी होत आहोत. या यशात महाज्योतीच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे विचार महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी मांडले. ते महाज्योतीच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. मंगळवारी (ता. 8 ऑगस्ट) नागपूर येथील मुख्य कार्यालयात महाज्योतीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना दिनांक 8 ऑगस्ट 2019 कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 नुसार करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाज्योतीची निर्मिती करण्यात आली. या दिवशी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने महाज्योतीची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी कुणाल शिरसाठे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महाज्योतीच्या कार्याचा उल्लेख केला. चार वर्षात महाज्योतीने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या योजना, त्याकरीता दिलेले विद्यावेतन, त्यातून यशस्वी विद्यार्थी पाहता महाज्योतीने खुप कमी कालावधीत स्वत:चे स्थान निर्माण केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा