मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

सोयाबिन पीकावरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

 सोयाबिन पीकावरील अळीचा प्रादुर्भाव

रोखण्यासाठी उपाययोजना

 

कृषी विभागाव्दारे शेतकऱ्यांना आवाहन

 

अमरावती दि. 8 : राज्यात 1 जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी पर्जन्यमान 603.1 मिमी असून या खरीप हंगामात दि. 7 ऑगस्ट  2023 पर्यंत प्रत्यक्षात 602.8 मिमी  ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 100 टक्के एवढा पाऊस पडलेला आहे. 

            खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून  ऑगस्ट 2023 अखेर प्रत्यक्षात 131.75 लाख हेक्टर 93 टक्के  क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे उरकत आली आहेत. या मध्ये प्रामुख्याने कापूससोयाबीनतूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. ऑगस्ट रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 48.38 लाख हे. क्षेत्रावरकापूस पिकाची 41.47 लाख हे. क्षेत्रावरतूर पिकाची 10.71 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 11.76 लाख हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे.

खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विं. बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे.राज्यात 19,70,904 क्विंटल 102 टक्के बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत 53.39 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 29.26 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 24.13 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

खरीप हंगाम सन 2023 राज्यांतर्गत पीकस्पर्धेमध्ये भातज्वारीबाजरीमकानाचणीतुरसोयाबीनभुईमूगसूर्यफूल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 ही पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरणेची अंतिम मुदत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

क्रॉपसॅप प्रकल्प सन 2023-24 अंतर्गत खरीप हंगामात राज्यातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, भात, मका, ज्वारी आणि ऊस पिकांचे सर्वेक्षण सुरु असून सद्यस्थितीत लातूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत सोयाबिन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळीचा (स्पोडोप्टेरा) प्रादुर्भाव दिसुन येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे फार गरजेचे आहे. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता पुढीलप्रमाणे उपाययोजनांचा अवलंब करावा.

सोयाबीन पिकांचे वेळोवेळी कीड व रोगांसाठी निरीक्षण  आणि  सर्वेक्षण करावे. पीक तणमुक्त ठेवावे. तंबाखुची पाने खाणारी अळी एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात त्यातून बाहेर पडलेल्या अळ्यासुरुवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगद तोडून नष्ट करावीत, भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात 8 ते 10 प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत, 5 टक्के निंबोळी अर्क 50 मिली 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी, अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. 500 एल.ई. विषाणु 2 मि.ली. प्रति लिटर पाणी किंवानोमुरीया रिलाई या उपयुक्त बुरशीचा 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, स्पोडोप्टेराया किडीची आर्थिक नुकसान पातळी 10 अळ्या,मिटर ओळ असून पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रती हेक्टरी लावावेत व निरिक्षणेनोंदवावीत, किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच खालील रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा,या किडीच्या नियंत्रणासाठीफ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 1.90 ईसी प्रति 4 ग्रॅम 8.5 मिली किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी 5 मिली किंवा स्पायनोटोरम 11.8 एससी 9 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.80 ईसी 6.7 मिली किंवा नोवॅल्युरोन 5.25 अधिक इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16.5 मिली  यापाकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

बोगस निविष्ठांच्या तक्रारींसाठी संपर्कक्रमांक जारी

 

कृषी  विभागामार्फत खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खतेकीटकनाशके किंवा बियाणे याबाबत तक्रार असल्यास ८४४६११७५००, ८४४६२२१७५०८४४६३३१७५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष २४ ७ कार्यरत राहील. या संदर्भातील  तक्रार  शेतकऱ्यांना ९८२२४४६६५५ या व्हाट्स अॅप क्रमांकावर केवळ व्हाट्स अॅप संदेशाद्वारे नोंदविता येईल. याशिवाय शेतकरी आपली तक्रार  controlroom.qc.maharashtra@gmail.com  या मेल आयडीवर  सुद्धा मेल द्वारे करू शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. कृषी विषयक योजनांच्या माहितीसाठी १८००२३३४००० हा कृषी विभागाचा हेल्पलाईन नंबर असून शेतकरी बंधूंनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी आयुक्त  सुनील चव्हाण  यांनी  राज्यातील  शेतकरी  बांधवाना केले आहे.

00000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा