इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकांत बदलाबाबत सूचना
अमरावती दि. 10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै- ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) दि. 18 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तथापि राज्यातील काही जिल्ह्यामध्ये दि. 20 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. सबब उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) पुरवणी परीक्षेतील वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला असून तो खालीलप्रमाणे आहे.
दिनांक गुरुवार दि. 20 जुलै 2023 ला सकाळच्या व दुपारच्या सत्रांत होणारे सर्व विषयांचे पेपर दि. 11 ऑगस्ट रोजी सकाळच्या व दुपारच्या सत्रात होईल.
तरी वेळापत्रकातील उपरोक्त बदलाची सर्व परिक्षक, केंद्रसंचालक संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, पालक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे विभागीय मंडळाचे सहसचिव तेजराज काळे यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा