बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या फार्म नं. 17 भरुन प्रविष्ठ होण्याबाबत सूचना

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खाजगीरित्या

फार्म नं. 17 भरुन प्रविष्ठ होण्याबाबत सूचना

अमरावती दि. 9 : महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

              माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ. 10 वी) खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये संपर्क केंद्रामार्फत सर्व कार्यवाही राबविण्यात येत होती. मात्र, प्रचलित पध्दतीमधील अडचणींचा, त्रुटीचा विचार करुन सदरची योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभदायी, सुलभ व विद्यार्थी केंद्रात व्हावी, या दृष्टीने सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्विकारण्याची प्रचलित पध्दत बंद करुन इ. 12 वी च्या विद्यार्थ्यांचे ज्या पध्दतीने सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नाव नोदणी अर्ज स्विकारण्यात येतात त्याप्रमाणे माध्यमिक शालात्न प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) च्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून स्विकारण्याची कार्यपध्दती मार्च 2024 च्या परीक्षेपासून सुरु करण्यात येत आहेत.

                तरी सर्व माध्यमिक शाळांनी यांची नोंद घेऊन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतू किमान इ. 5 वी उर्त्तीण असलेल्या मुला – मुलींना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शन पुस्तिका मंडळाच्या संकेतस्थळावर http://mahahsscboard.in प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळांशी संपर्क साधावा.

              त्यानुसार फेब्रुवारी – मार्च 2024 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. 17) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17 )ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.

            इ. 10 वी व इ. 12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

            इयत्ता 12 वीसाठी विद्यार्थ्यांनी 10 ते 11 सप्टेंबर 2023 तर इयत्ता 10 वीसाठी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2023. दरम्यान ऑनलाईन नोंदणी अर्ज व शुल्के भरणा करता येईल. तसेच 12 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यर्थ्यांनी मुळ अर्ज, नावनोंदणी शुल्क भरणा पोचपावती व मुळ कागतपत्रे अर्जात नमूद माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावीत. दि. 15 सप्टेंबर 2023 ला संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रांनिशी यादी मंडळाकडे जमा करावी.

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी व इ. 12 वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईटचा वापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना इ. 10 वी – http://form१७.mh-ssc.ac.in व 12 वी – http://form१७mh-hsc.ac.in संकेतस्थळावर मराठी, इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सहा. सचिव संगीता सांळुके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा