प्रधानमंत्री
पिक विमा योजनेस 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
सहभागी होण्याचे
शेतकऱ्यांना आवाहन
योजनेत सहभागी होण्यासाठी
3 ऑगस्ट अंतीम मुदत
अमरावती, दि. 02 : अमरावती विभागात बुलढाणा, अकोला,
वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम
2023-24 मध्ये राबविण्याबाबत दि. 26 जून 2023 च्या शासन निर्णयान्वये मान्यता
देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार ही योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामकरिता Cup & Cap model (80:110) नुसार अधिसूचित
क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (area approach) धरून राबविण्याचे
सूचित करण्यात आले होते.
त्यानुसार
विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून तिन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
अमरावती विभागात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरेंस कं. लि
तसेच वाशिम, बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी तर अकोला जिल्ह्यामध्ये
एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरेंस कं. लि. आदीमार्फत पिक विमा योजनेची अंमलबजावणी
करण्यात येत आहे. दि. 30 जुलै 2023 अखेरपर्यत विभागात पिक विमा योजने अंतर्गत २७
लाख ६० हजार १९३ अर्ज नोंदविण्यात आले असून पेरणी झालेल्या ३० लाख २१हजार ६५८
हेक्टर क्षेत्रापैकी २२ हजाख ७८ हजार २९८ क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे.
तथापि,
मागील काही दिवसात आधार सेवा विस्कळीत होणे. महाभूमी अभिलेखचे व CSC चे सर्वर तसेच
पिक विमा पोर्टलचा वेग कमी होणे, इत्यादी तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही
ठिकाणी शेतकऱ्यांचा विमा अर्ज प्रलंबित राहणे किंवा सहभागी होण्यास अडचणी निर्माण
झाल्या होत्या.
सदर
बाब राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावर केंद्र शासनाने पिक
विमा मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढवून दिली असून 31 जुलै ऐवजी 3 ऑगस्ट
2023 ही विमा मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेचे
कर्ज घेताना विमा कपात न करणेबाबत बँकांना लेखी दिलेले असेल, त्यांनाही
बिगरकर्जदार म्हणून विमा अर्ज करून सदर विमा योजनेत सहभाग घेता येईल. तरी ज्या
शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये
सहभाग घेतला नसेल, त्या शेतकऱ्यांनी त्वरित CSC सेंटरवर जाऊन एक रुपया मध्ये पिक
विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक
के.एस.मुळे यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा