मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या  नागरी सेवा परीक्षेच्या   

पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 

अमरावती दि. 8 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 च्या पूर्व प्रशिक्षणाकरीता विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरिता जाहिरातीत नमूद केलेल्या अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी दि. 14 ऑगस्टपर्यंत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दि. 14 ऑगस्ट आहे. परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दि. 15 ऑगस्ट, 2023 आहे. प्रवेश परीक्षा (Entrance Examination) दि. 27 ऑगस्टला ऑफलाईन पध्दतीने राहील. परीक्षेची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत राहील.

सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता व्ही. पकडे (यावले) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा