फेब्रुवारी-मार्च
2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक जाहीर
अमरावती,दि.25: फेब्रुवारी मार्च 2025
मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती
संभाजी नगर,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत
आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12,वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र
10,वी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढील प्रमाणे
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12,वी परीक्षा
सर्वसाधारण व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान
विषयांची ऑनलाईन परीक्षा,लेखी व प्रात्यक्षिके परीक्षेचा कालावधी मंगळवार दि. 11 फेब्रुवारी
2025 ते मंगळवार दि. 18 मार्च 2025 असा राहील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत
मूल्यमापन तसेच (एन.एस.क्यु.एफ) अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षेचा
कालावधी शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 सोमवार 10 फेब्रुवारी 2025 असा राहील. माध्यमिक
शाळांत प्रमाणपत्र 10,वी परीक्षेचा कालावधी शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2025 ते सोमवार
दि. 17 मार्च 2025 असा राहील. प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन
परीक्षेचा सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2025 ते
गुरुवार 20 फेब्रुवारी 2025 असा राहील.
उपरोक्त कालावधीमध्ये
आयोजित केलेले दिनांक/निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscbord.in या अधिकृत
संकेतस्थळावर दि.21 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील
वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक
शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम
असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी
परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच
व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यासंदर्भात
संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
कळविले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा