अमरावती
विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनात
अमरावती दि. 21 : विधानसभा
सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी झाले. त्या अनुषंगाने अमरावती
विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
रोड वरील लोकशाही भवन येथे होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या
पत्राअन्वये लोकशाही भवन, संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठ रोड अमरावती यास
मतमोजणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी
केंद्रावर अनुषंगिक सोयी सुविधा व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
23 नोव्हेंबरला मतमोजणीची
प्रक्रिया सकाळी 8.00 वाजता पासून सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना
लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत,
अशी माहिती अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी
दिली आहे.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा