निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र
तात्काळ सादर करण्याचे आवाहन
अमरावती,दि.19: कोषागारामधुन निवृत्तीवेतन
स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी
आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात
संबधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी
त्यांच्या पेन्शन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या
निवृत्तीवेतनधारकांच्या हयात यादीवरच स्वाक्षरी करावी. तसेच विहीत नमुन्यात संपूर्ण
माहिती भरावी (बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईल नबंर सोबत घेउन जावे). निवृत्तीवेतनधारकांनी
30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर
2024 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. ह्यातीचे प्रमाणपत्र ई-मेल द्वारे सादर करू
नये, असे केल्यास ते स्वाकारले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
तसेच जीवन प्रमाण पोर्टल वर तयार झालेले
हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातात त्यामुळे अशा प्रमाणपत्राच्या
मुद्रित प्रती सादर करू नये. असे दिल्यास ते देखील स्वीकारले जाणार नाही याची नोंद
घ्यावी. असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार व कोषागार अधिकारी अमोल इंखे
(नि.वे.) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा