इयत्ता दहावीच्या गणित व विज्ञान उत्तीर्णतेच्या विषयाच्या निकषाबाबत
सूचना जारी.
अमरावती,दि.
27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च
2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10,वी परीक्षेत गणित आणि विज्ञान
या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. यावर्षी
या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल, याची नोंद
सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी,
पालक व अन्य संबंधित घटक यांनी घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा