लोकशाही भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण
अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी
अमरावती, दि. 22 : विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट, ईटीपीबीएमएस आणि ईव्हीएम वरील मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील 345 आणि 23 सहायक मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले आहे. या सर्व मतदानकेंद्रावर ईव्हीएमद्वारे झालेले मतदान मतमोजणीकरीता प्रत्येक फेरीसाठी 14 टेबल, तसेच पोस्टल मतपत्रीकेची मतमोजणी करण्याकरीता 10 आणि ईटीपीबीएमएसकरीता 1 याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी वेळी याठिकाणी गर्दी होणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत सौरभ स्वामी यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी निरीक्षक मतमोजणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून त्याची पाहणी करतील. मतमोजणीची माहिती देण्यासाठी मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा