पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी 21 व्या पशुगणनेस सुरुवात
अमरावती,दि.27:केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या मार्फत व सलग्न पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दि. 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 21 वी. पशुगणना संपूर्ण जिल्ह्यामध्ये पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहीती गोळा करण्यासाठी पशुगणना हे एक महत्वाचे साधन आहे.
त्या अनुषंगाने पशुगणनेची उद्दिष्टे बहुआयामी असून पशुधन क्षेत्र सुधारण्यासाठी असलेल्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, सुसुत्रिकरण, अमंलबजावणी बाबतचे देखरेख सुलभ करण्याच्या अनुषंगाने 21 वी. पशुगणना एकविसाव्या पशुगाने सुरुवात झाली आहे सांख्यिकीय माहितीसाठी पशु गणना अचूक होणे आवश्यक आहे. पशु गणनेसाठी पशुपालक गौशाळा चालक व नागरिकांनी यात सहभागी होऊन प्रगणकास अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
पशुगणना ही दर पाच वर्षांनी होत असून, पशुधनाबाबत व विविध पशुधन प्रजातीची लोकसंख्या, त्यांची जात, वय, आणि लिंग यासह तपशीलवार आणि अचूक माहिती गोळा करणे हे पशुधानाचे उद्दिष्ट असुन, पशुक्षेत्राचा विकास आणि सुधारणा करण्याच्या धोरणे कार्यक्रम उपक्रमाबाबतचे नियोजन या करीता पशुगणनाची आवश्यकता असल्याने व पशुगणनेची माहिती घेताना पशुधनाशी संबधित कार्यक्रम व योजनाची प्रभावी अमंलबजाणी ही पशुधनाच्या संख्येवर अवलबून असुन,
पशुगणनेच्या अनुषगांने क्षेत्रिय स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक हे नेमलेले असून, त्यांचे द्वारे प्रत्येक पशुपालकाच्या घरी जावून जनावरांना टँगीग करुन जनावराबाबतचा तपशीलाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. यामध्ये गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, वराह, घोडा, गाढव, उंट, ई. पाळीव प्राणी तथा पक्षांची माहीती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये नेमलेले प्रगणक घरोघरी जावून माहीती घेणार आहेत. ग्रामीण भागामध्ये 3 हजार कुंटुबा मागे एक प्रगणक व शहरी भागामध्ये 4 हजार कुंटुबा मागे एक प्रगणक या प्रमाणे नियुक्ती करण्यात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मध्ये सहभागी होवून योग्य माहीती द्यावी असे ही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा