शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
राजभवनात ‘वंदे मातरम्’चे सूर निनादले ‘वंदे मातरम’ गीताचा १५० वा स्मृतिदिन
मुंबई,दि.७ : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण 'वंदे मातरम' गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन केले.
सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'वंदे मातरम् ' या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे 'वंदे मातरम्' या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा