सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 23 नोव्हेंबरला

अमरावती, दि. 10 :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) दि. 10 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत उमेदवारांना उपलब्ध करून दिली जातील. उमेदवारांनी प्रवेशपत्र www.mahatet.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यावी, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच परीक्षेबाबत सर्व संबंधित सूचना, अद्ययावत माहिती आणि उमेदवारांसाठीच्या सूचना परिषदेकडून त्याच संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी त्या वेळोवेळी पाहून योग्य ती तयारी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा