गुरुवार, १ जानेवारी, २०२६
राजीव गांधी गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 31 : ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ सन
2025-26 या स्पर्धेचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी एका पत्राव्दारे कळविले
आहे. दि. 3 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार या योजनेअंतर्गत
घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व स्तरावर प्रस्ताव स्विकारण्याची मुदत ३१ ऑक्टोबर
२०२५ अशी होती. तथापी विधिमंडळाचे अधिवेशन व राज्यातील स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणूका यामुळे हे प्रस्ताव सादर करण्याकरीता आता दिनांक १२ जानेवारी
२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागांनी अधिनस्त सर्व
कार्यालयांना आवश्यक त्या सूचना देण्याबाबत विभागीय आयुक्तालयाव्दारे कळविण्यात आले
आहे. ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या स्पर्धेचे
प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणे.तसेच अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व अनुषंगिक
बाबींवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदर
पोर्टलच्या संकेतस्थळाची लिंक “pragatiabhiyan.maharashtra.gov.in” अशी आहे, असेही
विभागीय आयुक्तालयाव्दारे कळविण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा