गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती दि. 29 : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक
शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती
देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा
परीक्षा 2025” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने 3 फेब्रुवारी व 4 फेब्रुवारी या
कालावधीत प्रत्येक दिवशी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे
प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने 29 जानेवारीपासून www.mscepune.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात आले आहे, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे
आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. परीक्षार्थी
उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशपत्र डाउनलोड
करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 1800222366/18001034566 या
हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा. व तसेच काही तक्रार असल्यास http://cgrs.ibps.in/
या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आवश्यक असलेला
लॉगिन आयडी रजिस्ट्रेशन नंबर आवेदनपत्रावर उपलब्ध आहे. तसेच पासवर्ड हा संबंधित
उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे, याची सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद
घ्यावी असेही महाराष्ट्र परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा