भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त
राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत
आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ
पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे
आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने
सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड
जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथे आयोजित पत्रकार
परिषदेत केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या
हक्कांसाठी, जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात
दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा त्याग, संघर्ष आणि समाजसुधारणेचे कार्य
सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना ‘धरती आबा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या
जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा केला
जातो, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा