दहावी व बारावीच्या
विद्यार्थ्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
अमरावती दि.29 : इयत्या 10 वी
12 वी च्या विद्यार्थ्याना फेब्रुवारी/ मार्च 2020 या शैक्षणिक वर्षात खाजगी रित्या
प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन नांव नोंदणी करण्यास
दिनांक 11 सप्टेंबर पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. दि. 27 सप्टेंबर पासून
विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज सादर करावे. दि. 16 सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी
विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in ; http://form17.mh-hsc.ac.in ;या बेवसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला
(मुळ प्रत),नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील
फोटो अर्जासोबत द्यावा. ऑनलाईन अर्ज सादर करतांना सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड
करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या
दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची
छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी.पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र
प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत
परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. असे विभागीय
मंडळाचे सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा