मुख्यमंत्री, संरक्षण
मंत्री यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन
अमरावती, दि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे अमरावती येथील बेलोरा विमानतळ येथे आज आगमन झाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समवेत महसूलमंत्री चंद्रकांत
पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन
झाले. पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष
आमदार डॉ. सुनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले.
केंद्रीय मंत्री श्री. सिंह यांचे अमरावती विमानतळावर आगमन झाले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी श्री. सिंह यांचे स्वागत
केले. श्री. सिंह यांच्यासमवेत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार होते.
यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद
रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, पोलिस
आयुक्त संजय बावस्कर, जिल्हा पोलिस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त संजय
निपाने आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा