इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
26 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि.9: खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 12 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच
भरावयाचे आहेत. विद्यर्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज प्रिट करुन त्यांच्या अर्जावर दिलेल्या
कनिष्ठ महाविद्यालयात मूळ कागदपत्रासह व शुल्कासह दि. 26 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावयाचे
आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची
आहे, नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांनी पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय
त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी असेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी
करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक/तोंडी,
श्रेणी परीक्षा द्यावयाची आहेत.
ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही
अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 202-25705208/25705207/25705271
वर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा