प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा
अमरावती, दि.16: प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र
अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी
वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची
कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात
आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानवधन
योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सव पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना
दरमहा रक्कम रु. 3000/- ( तीन हजार) निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान
मानधना योजना ही ऐच्छिक व अशंदायी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा
निगम (एल.आय.सी.) द्वारा (Managed) पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना
पेन्शन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या
वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणीकरण्यासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत
पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम रु. 55 ते 200/- प्रती माहे मासिक हप्ता वयाचे पूर्ण
होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा
केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांच्या पेन्शन
फंडामध्ये जमा करणार आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती-पन्ती स्वतंत्र पणे योजनमध्ये
भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यांनतर त्यांना
स्वतंत्रपणे रु 3000/- मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या पात्र अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी
योजनमेध्ये भाग घेतलेला असून काही कारणामुळे
त्यांना योजनेतून बाहेर पडायचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्क्म
व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सेवानिवृत्ती
तारखेपुर्वी ( म्हणजे वय 60 वर्षे पूर्ण होण्यापुर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे
60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरीत मासिक हप्ते पती/पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करुन
त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या
पती/पत्नी नसल्यास त्या शेतकऱ्यांचे पेन्शन
फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदारास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी
निधन झालेल्या शेतकऱ्याचे पती-पत्नीस दर महा 50 टक्के म्हणजे रु. 1500/- पारिवारीक
मासिक पेन्शन मिळेल. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पी.एम.किसान मानधन योजनेची अंशदायी
हप्ता रक्कम कपात करण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र
(csc-common service centre) मार्फत https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी
करावयाची असून सदर नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी
नोंदणी फी रक्कम रु. 30 (प्रती शेतकरी) सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात योणार आहे.
नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे
(आधारकार्ड,बँक पासबुक, मोबाईल नंबर इ.) सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री
किसान मानधन योजनेसाठी अपात्रतेचे निकष
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना
(एन.पी.एस), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम,यासारख्या
इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री
श्रम योगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र
असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन
योजना (पी.एम.एल.व्ही.एम) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. उच्च
आर्थिक स्थितीतल शेतकरी लाभार्थी खालीप्रमाणे
प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील. जमीन धारण
करणारी संस्था, सवैधानिक पद धारक करणारी/ केलेलीआजी/ माती व्यक्ती, आजी/ माजी मंत्री,
खासदार, आमदार, महापालीकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/
कर्मचारी,शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/
कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/ गट-ड वर्ग कर्मचारी वगळून) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती,
नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर,वकील,अभियंता,सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ
(आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती,असल्यास योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी
या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय कृषी
सहसंचालक अमरावती विभाग , अमरावती यांनी केले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा