नागरी सेवा 2020
25 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे
प्रेवश परीक्षा 6 ऑक्टोंबर रोजी
अमरावती, दि.20: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या
नागरी सेवा परीक्षा-2020 मध्ये विनामुल्य पुर्व प्रशिक्षणाकरीता भारतीय प्रशासकीय
सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे प्रवेश परीक्षा फक्त अमरावती केंद्रावर घेण्यात येत आहे. अटींची पूर्तता
करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online
)पध्दतीने www.preiasamt.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची
सुरुवात दि. 26 ऑगस्ट 2019 पासून होत असून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दि. 25 सप्टेंबर
2019 आहे. परिक्षेचे प्रवेश पत्र दि. 1 ऑक्टोंबर 2019 पर्यंत Online पध्दतीने उपलब्ध
होतील ते 6 ऑक्टोंबर 2019, प्रवेश परीक्षा दि. 6 ऑक्टोंबर 2019 सकाळी 11.00 ते दुपारी
1.00 या वेळेत घेण्यात येईल.
सविस्तर जाहिरात,परीक्षेचा
अभ्यासक्रम Online अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सुचना संस्थेच्या www.preiasamt.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे डॉ.
एम.पी.वाडेकर, संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती
यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा