महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी
31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि.13: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दिनांक
13 ऑगस्ट 2019 पासून दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत
स्विकारण्यात येणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी
मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा
करावे. दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत संपर्क केंद्र शाळा ही यादी विभागीय मंडळाकडे सादर
करतील. अधिक माहितीसाठी या http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी असे डॉ. अशोक भोसले,सचिव
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा