अमरावती विभागातील पावसाची स्थिती
अमरावती विभागात जुलै महिन्यात पावसात चांगलाच खंड पडला होता आणि खरीप हंगामाबाबत चिंतेची परिस्थिती निर्माण झाली होती. तथापी 26 जुलै पासून विभागात पावसाचे पुनरागमन झाले असून त्यामुळे पिक परिस्थितीत चांगलीच सुधारणा झाली आहे. मात्र जलाशयातील पाणीसाठा वाढण्यासाठी पावसाची गरज आहे.
विभागात 4 ऑगस्ट पर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढील प्रमाणे असून कंसात त्या जिल्हयात 26 जुलै पर्यंत झालेला पाऊस नमूद केलेला आहे. त्यावरुन गेल्या आठ-दहा दिवसात बदललेल्या परिस्थितीचा अंदाज येईल.
अमरावती 423 (203), अकोला 396.7 (232.7), यवतमाळ 323.9 (153.5), बुलढाणा 393.2 (251.5), वाशिम 302.9 (184.5).
अमरावती विभागात 4 ऑगस्ट पर्यंत सरासरी 367.9 मीलीमीटर पाऊस झाला आहे. विभागाची 1 जून ते 4 ऑगस्ट या कालावधीची पावसाची सरासरी 434.6 मि.मी. इतकी असून त्यातुलनेत 86.6 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी 777.9 मि.मी. असून यातुलनेत आजवर 48.2 टक्के पाऊस झाला आहे.
विभागात एकूण 56 तालुके आहेत. पैकी अमरावती जिल्ह्यातील 14 पैकी अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, धारणी, चिखलदरा या 7 तालुक्यात, अकोला जिल्ह्यातील 7 पैकी बारशी टाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या पाच तालुक्यात, बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी बुलढाणा, चिखली, मलकापूर, नांदूरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या 9 तालुक्यात 1 जून ते 4 ऑगस्ट या कालावधीतील सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागातील तालुक्याची ही संख्या 21 एवढी आहे. यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यातील एकाही तालुक्यात आजवरच्या सरासरी इतका पाऊस यंदा झालेला नाही.
विभागात आज नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी तालुक्यात 1 जून पासून आजवर झालेला पाऊस दर्शविते.
अमरावती जिल्हा : अमरावती 3.2 (405.2), भातकूली 4.7 (244.6), नांदगाव खंडेश्वर 3.0 (356.7), चांदूर रेल्वे 5.0 (468.1), धामणगाव रेल्वे निरंक (475.5), तिवसा 0.2 (335.5), मोर्शी 8.1 (319.1), वरुड 13.1 (334.3), अचलपूर 5.2 (413.6), चांदूर बाजार 16.6 (455.8), दर्यापूर 3.1 (320.0), अंजनगाव 5.1 (310.1), धारणी 3.3 (636.2), चिखलदरा 16.9 (846.8). अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 6.2 मि.मि पाऊस झाला. तर यंदा आजवर सरासरी 423.0 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 93.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 51.9 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 11.5 (335.7), बार्शी टाकळी 5.0 (421.1), अकोट 2.2 (408.2), तेल्हारा- 5.5 (430.6), बाळापूर 6.0 (435.2), पातूर 1.8 (426.1),मुर्तीजापूर 5.0 (320.1). जिल्ह्यात 24 तासात सरासरी 5.3 मि.मि तर आजवर 396.7 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 101.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 56.9 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 4.4 (255.4), बाभूळगाव 3.0 (318.8),कळंब 2.5 (275.3), आर्णी 4.0 (396.4), दारव्हा 1.1 (262.8), दिग्रस 4.0 (270.9), नेर निरंक (250.6), पुसद 34.4 (359.1), उमरखेड 48.6 (373.7), महागाव 55.7 (332.0), केळापूर 5.9 (365.4), घाटंजी 2.9 (321.3), राळेगाव 1.3 (336.9), वणी 7.0 (362.2), मारेगाव 1.8 (393.1), झरी जामणी 10.6 (308.0) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 11.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 323.9 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 62.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 35.5 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 0.6 (552.3), चिखली 1.5 (400.3), देऊळगाव राजा 0.8 (228.6), मेहकर 0.2 (365.1), लोणार निरंक (319.4), सिंदखेड राजा 2.6 (341.4), मलकापूर 1.2 (378.3), नांदूरा 5.7 (409.4), मोताळा 1.1 (358.8), खामगाव 0.3 (349.2), शेगाव 2.4 (449.2), जळगाव जामोद 4.6 (442.4) संग्रामपूर 8.4 (516.8) जिल्ह्यात दिवसभरात 2.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 393.2 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 107.0 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 58.9 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 5.6 (356.8), मालेगाव 0.9 (319.5), रिसोड 3.3 (350.6), मंगरुळपिर 1.7 (286.5), मानोरा 9.6 (266.1), कारंजा 1.3 (238.0) जिल्ह्यात 24 तासात 3.7 तर 1 जून पासून आजवर 302.9.2 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 3 ऑगस्ट या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 67.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 37.9 टक्के इतके आहे.
पाणीसाठा: अमरावती विभागात 9 मोठे 24 मध्यम तर 469 लघुप्रकल्प आहेत.
मोठ्या प्रकल्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील बेबळा या प्रकल्पाचा अफवाद वगळता एकाही प्रकल्पात 50 टक्क्या पेक्षा अधिक पाणीसाठा झालेला नाही. 9 प्रकल्पात मिळून सरासरी 23.4 टक्के पाणीसाठा झाला आहे.
विभागातील 24 मध्यम प्रकल्पात सरासरी 40.85 टक्के पाणीसाठा झालेला असून अमरावती जिल्ह्याती सपण, यवतमाळ जिल्ह्याती सायखेडा, बुलढाणा जिल्ह्यातील पलढग या प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत आहे. आज कुठेही पूर परिस्थिती नाही. विभागातील 469 लघुप्रकल्पात 17.13 टक्के पाणीसाठा आहे. विभागातील एकूण 502 प्रकल्पातील पाणीसाठ्याची टक्केवारी 24.95 टक्के एवढी आहे.
अमरावती विभागात जलयुक्त शिवार मोहिमेत विविध कामे झालेली आहेत. शेततळी, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण अशा कामांचे यश दिसणास सुरुवात झाली आहे. समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होत आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा