अटल महापणन विकास अभियान अंतर्गत
विविध उपक्रमाबाबत लोक संवाद मोहिम सुरु
अमरावती, दि.20: महाराष्ट्र शासनाकडून राज्यात सुरु असलेल्या अटल महापणन योजनेअंतर्गत
सुरु असलेल्या खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय
सुरु केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमातून सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या
महिला बचत गट,शेतकरी व सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. जेणेकरुन सहकारी
संस्थांना बळकटीकरणासाठी मदत होईल. महाराष्ट्रात अटल महापणन अभियानाअंतर्गत एकूण
3000 हजार पेक्षा जास्त विविध कार्यकारी संस्थानी व्यवसाय सुरु केले आहे. तर अमरावती
विभागात अटल महापणन अंतर्गत एकूण 918 संस्थांची निवड करण्यात आली असून त्यापैकी
359 संस्थांनी नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु केले आहे.
अनेक व्यवसाय सुरु होत आहेत.
अमरावती विभागातील गावातील अनेक सेवा सहकारी व खरेदी विक्री संस्थानी नाविण्यपूर्ण
व्यवसाय सुरु करुन ग्रामीण भागातील शेतकरी सभासंदाचा सर्वागीण विकास होत आहे.
याकरीता सहकार विभागामार्फत
लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती
येथे जिल्हा उपनिबंधक,सहायक निबंधक,सहकारी संस्था यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी
कार्यशाळा घेऊन संवाद मोहिमेचा शुभारंभ केला. याद्वारे जिल्हास्तरावर व तालुका व गावपातळीवर
लोक संवाद कार्यक्रम घेऊन विविध उपक्रमाची माहिती लोकापर्यंत प्रसार माध्यमातून देण्यात
येत आहे. दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरी भागातील
गृहनिर्माण संस्थामध्ये कॉपशाप द्वारे कृषी माल व महाफार्म बॅन्डद्वारे कृषी माल विविध
मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.याबाबत शेतकरी सभासदांना अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाची
माहिती मिळाल्यास ते या उपक्रमाशी जोडले जातील. व शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास
होईल.
अमरावती विभागात उत्कृष्ठ
व्यवसाय सुरु केलेल्या संस्थांची सक्षिप्त माहिती :
अमरावती जिल्ह्यात नेरपिगंळाई
सेवा संस्था सोनेतारक खते विक्री, बि-बियाणे कापड दुकान इ.व्यवसाय प्रगतीपथावर असून
त्यापासून गावपातळीवर लोकांना फायदा होत आहे. दर्यापूर खरेदी विक्री, मोर्शी खरेदी
विक्री व इतर सेवा सहकारी संस्था, विविध नाविण्यपूर्ण व्यवसाय करीत आहे. अकोला जिल्ह्यात
मोरगाव येथे सौर उर्जा विज निमिर्ती सुरु करण्यात आली आहे. तसेच चाळणी यंत्र व स्पायरल
सेपेरेटर इत्यादी व्यवसाय सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाढंरकवडा खेरदी विक्री सहकारी
संस्थेनी माती परिक्षण केंद्र, खत खरेदीवर अपघात विमा केंद्र सुरु केले आहे. इतर सेवा
सहकारी संस्थांनी सेद्रिय गांडूळ खतनिर्मीती व विक्री, आर.ओ. वाटर केंद्र, झेरॉक्स
केंद्र, मशरुम विक्री, विद्युत विज भरणा केंद्र इत्यादी व्यवसाय सुरु केले असून त्यापासून
शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सेवा सहकारी संस्था मार्फत धान्य
चाळणी, चहा कॅन्टीग, साडी सेंटर, पशुखाद्य विक्री, दुध डेअरी, माल तारण कर्ज व्यवसाय
सुरु केलेले आहे. अशी माहिती विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था, अमरावती यांनी दिली.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा