अल्पसंख्यांक
विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थ्यांनी
31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि.
23 : केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक
विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 साठी www.scholarships.gov.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली असून
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नविन मंजूरी व नूतनिकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा
अंतिम 31 आक्टोंबर, 2019 आहे. तरी सदर योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी National Scholarship Portal वरील मार्गदर्शक
सूचना व Frequently Asked Questions (FAQs)
वाचून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे डॉ. संजय जगताप, सहसंचालक
उच्च, शिक्षण अमरावती विभाग यांनी कळविले आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा