गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

शासकीय कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची 30 ऑगस्टला कार्यशाळा

                                     शासकीय कार्यालयाच्या

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची 30 ऑगस्टला कार्यशाळा

अमरावती, दि. 29 : प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी-2), नागपूर आणि अमरावती वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता 30 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही महत्वपूर्ण कार्यशाळा सकाळी 10.30 वाजता सुरु होणार असून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना व्हीपीडीए प्रणाली, ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ, एनपीएस, ई-कुबेर, ई-बील या प्रणाली संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच यानुषंगाने येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरणाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

0000

मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांची बडनेरा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट

                     मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांची

बडनेरा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट

अमरावती, दि. 29 : मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी व्दितीय भेट कार्यक्रमांतर्गत बुधवारी (ता. 28 ऑगस्ट) बडनेरा मतदार संघातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी व केंद्रांवर असलेल्या सुविधांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक तथा नोडल अधिकारी अजय लहाने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, नायब तहसीलदार मधुकर धुळे, विलास वाढोणकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्तांनी बडनेरा मतदार संघांतर्गत येणाऱ्या वडाळी, यशोदानगर, संजय गांधी नगर परिसरातील लोटस (करण) इंग्लीश प्रि प्रायमरी स्कुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील  मतदान केंद्राची पाहणी केली.

भारत निवडणूक आयोगाव्दारे विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतदार यादी निरीक्षकांना 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विभागातील सर्व जिल्ह्यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तीन भेटी करावयाच्या असून, त्यानुसार प्रथम भेट व आढावा बैठका यापूर्वी घेण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांकरीता दि. 28 ऑगस्ट व दि. 29 ऑगस्ट रोजी व्दितीय व तृतीय भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला असून त्यानुसार आज विभागीय आयुक्तांनी मतदानकेंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी, मतदार याद्या, बडनेरा मतदारसंघातील एकुण पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग, जेष्ठ मतदारांची संख्या याबाबत संबंधितांकडून माहिती घेतली.

दरम्यान, कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवावयाचा शिल्लक राहू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. भारत निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सुधारित कार्यक्रमानुसार 6 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती मागविण्यात आल्या असून पात्र नागरिकांची नवीन

 मतदार नोंदणी, दुरुस्ती, वगळणी आदी कामे पूर्ण झाली आहेत. प्राप्त दावे व हरकतींचे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत निराकरण करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी, दुरूस्ती व वगळणी यासाठी दि.17 व 18 ऑगस्ट 2024 या दिवशी विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम राबविला गेला असून या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  मतदार यादीसह उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनुषंगीक कामे पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिली.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुद्धीकरण महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मतदार यादीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व एकही पात्र मतदार येत्या निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले. 

00000

शासकीय कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची 30 ऑगस्टला कार्यशाळा

                                                                शासकीय कार्यालयाच्या

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची 30 ऑगस्टला कार्यशाळा

अमरावती, दि. 29 : प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी-2), नागपूर आणि अमरावती वरिष्ठ कोषागार अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता 30 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही महत्वपूर्ण कार्यशाळा सकाळी 10.30 वाजता सुरु होणार असून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या कार्यशाळेत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना व्हीपीडीए प्रणाली, ई-पीपीओ, ई-जीपीओ, ई-सीपीओ, एनपीएस, ई-कुबेर, ई-बील या प्रणाली संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच यानुषंगाने येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरणाबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

0000

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद, आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला लखपती दिदींशी संवाद

आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना

जळगाव,दि.25 (जिमाका) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जळगाव येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक

व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला."अशी भावना लखपती दीदींनी यावेळी व्यक्त केली.

येथील प्राइम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर झालेल्या लखपती दिदी संमेलनापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक अशा 

80 लखपती दीदींशी संवाद साधला. या लखपती दिदी संवाद कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या राज्यांतील बॅंक सखी दिदीड्रोन दिदीपशु दिदीकृषी दिदी म्हणून नावारूपाला येऊन लखपती झालेल्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहानराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

ग्रामविकासपंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

०००००००

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बेलोरा विमानतळावर आगमन व स्वागत

अमरावती, दि. 24 (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री महोदयांचे स्वागत केले.

           आमदार रवी राणा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा , पोलीस अधीक्षक (ग्रामीण)विशाल आनंद, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री यावेळ उपस्थित  होते.

  यवतमाळ येथील महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमासाठी मंत्री महोदय नुकतेच  यवतमाळ येथे पोहचले आहेत.

000000

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ø  एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात लाभाचे वितरण

Ø  बहिणींना वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलोय

Ø  असंख्य बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला बांधली राखी

Ø  राज्यातील बहिणींना लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारीसह त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त आभार त्यांचे मानले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे. या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिण्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिण्याला 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे.

राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून स्त्री शक्तीचा जागर - देवेंद्र फडणवीस

        राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने स्त्री शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. 8 हजार 500 कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपुस केली जात आहे.

            शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला 12 तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करतो आहे. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही - अजित पवार

            मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खुष आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. योजनेतून महिलांना दरमहा 45 हजार कोटी रुपये आपण देतोय. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल. 

राज्यातील 52 हजार कुटुंबाना वर्षाला 3 सिलेंडर आपण मोफत देतोय. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या अनेक योजना राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आल्या. मुलींशी होणारे गैरवर्तन रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण केला. राष्ट्रपतींची मंजूरी झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. असे गैरवर्तन करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची देखील भावना असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु - संजय राठोड

        शेतकरी, महिला, गरीब, कामगार, युवक यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. सर्वसामान्यांच्या गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी त्याप्रमाणे योजना राबविल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 1 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यवतमाळ जिल्ह्यात 4 लाख 60 हजार महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेमुळे बहिणींना आता हात पसरायची गरज राहिलेली नाही. मुख्यमंत्री भावाने दिलेल्या ओवाळणीतून बहिणींनी खरेदी करून आपल्या भावाला राखी बांधली. राज्य शासनाने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना आणल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

            यवतमाळ येथे आज झालेल्या मेळाव्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. अशातही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 50 हजारांपेक्षी अधिक महिलांनी आपल्या मुख्यमंत्री भावाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावांना राख्या बांधल्या. भावाने केलेल्या घोषणेची वचनपूर्ती केली. काहीच दिवसात अपेक्षा नसतांना ओवाळणी देखील जमा झाल्याने आनंदाचे भाव महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

लाडकी बहीण व भावाला लाभाचे वितरण

यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिण व भावाला लाभाचे वितरण केले. लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रुती विलास भगत, नंदा सुतारकर, बेबी माणिक चव्हाण, नलिनी राम राठोड, चंदा सचिन शेंडे, शुभांगी शिंदे, प्रतिभा कोरडे, सुमन रमेश गेजीक, जया हरीदास विरदंडे, इंदिरा लक्ष्मण मांगरे, शुभांगी रविंद्र ढोरे, टिंकल आकाश उरगुंडे, संगिता शेषराव राठोड, रेश्मा शेख जावेद, नाझीया अमजतखा पठाण यांना लाभाचे धनादेश दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शितल घाडगे व वैष्णवी पैदपवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

0000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना, भर पावसात हजारोंच्या उपस्थितीसह उदंड प्रतिसाद, बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीसह उदंड प्रतिसाद

 बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह

यवतमाळ, दि.२४ (जिमाका) : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रकमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली.

वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्णी रोड स्थित किन्ही परिसरातील मैदानावर हजारोंच्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून महिलांनी या कार्यक्रमाला भर पावसात हजेरी लावली होती. बंजारा व आदिवासी समाजाच्या भगिनी पारंपारिक वेषभुषेत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तसेच यावेळी आदिवासी व बंजारा समाजबांधवांनी पारंपारिक नृत्य सादर करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वागत केले. मान्यवरांनीही गुलाब पुष्प उधळून लाडक्या बहीणींचे स्वागत केले. काही भगिणींनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञ भाव व्यक्त केला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या बहीणींच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्यातील आत्मविश्वास दर्शवत होता. आता आम्हीही कुणावर अवलंबून नाही, आमच्या लाडक्या भावाने आम्हाला आमचे हक्काचे पैसे दिले, ही भावना त्यात होती. त्यातून आलेला आनंद त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. यावेळी महिला भगिनी हात उंचावून मोबाईल टार्च लावून त्यांची आत्मनिर्भरता दर्शवित होत्या. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

                                                                                                        रक्षाबंधनचा सण गोड झाला - निशा राठोड

            दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील निशा रोहिदास राठोड यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. ' रक्षाबंधनच्या एक दोन दिवस आधीची घटना. सण जवळ आला होता, पण हातात पैसे नव्हते, खूप चणचण होती, मुलीला कपडे, शैक्षणिक साहित्य घ्यायचे होते, राख्या खरेदी केलेल्या नव्हत्या आणि इतक्यात...माझ्या फोनवर बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला....!" आणि माझी चिंता मिटली....' अशा शब्दात भावना व्यक्त करताना त्यांचे डोळे पाणावले होते. निशा राठोड यांच्यासारख्याच यवतमाळ जिल्ह्यातील लाखो महिला लाडक्या बहिणी ठरल्या आहेत. त्यातील काही मोजक्या भगिनींच्या या बोलक्या प्रतिक्रिया....

भेट भावाची, ठेव मुलांच्या भविष्याची – सुनीता रामटेके

            'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानते. या योजनेचा अर्ज करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. माझ्या खात्यात बरोबर तीन हजार रुपये जमा झाले. या योजनेतून मिळालेले पैसे भावाची भेट म्हणून माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणार आहे, अशी भावना व्यक्त केली आर्णी तालुक्यातील लोणी येथील सुनीता रामटेके  यांनी. अशीच प्रतिक्रीया लोणी येथील रहिवासी मिना शिंदे यांनी देऊन मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानले.

                  मुख्यमंत्री नावाच्या भावाने दिली कल्याणकारी योजनांची शिदोरी - श्वेता चव्हाण

            शासनाने केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ दिला नसून महिलांना अनेक कल्याणकारी योजनांची शिदोरी दिली. या योजनांच्या मदतीने आम्ही आमचे आरोग्य, शैक्षणिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीण योजनेतून मिळालेली रक्कम ही मुलांचे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी उपयोगी पडली. त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानते, अशी भावना दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी श्वेता विठ्ठल चव्हाण यांनी व्यक्त केली.

संसाराला हातभार लाभला – संगीता चव्हाण

            मी शेत मजुरीचे काम करते. घरात नेहमी पैश्याची चणचण भासत होती. आता माझ्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. या पैशांची संसाराला मदत होईल. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी हे पैसे अडचणीच्या काळात नक्की उपयोगी पडतील. या पैश्यातून मी माझ्या चारही मुलींसाठी शैक्षणिक साहित्य व कपडे खरेदी करणार आहे. योजनेतून पैसे मिळाल्या निमित्त मी मुख्यमंत्री महोदयांची खूप खूप आभारी आहे. ही योजना अशीच नियमितपणे सुरु राहावी, अशी भावना व्यक्त केली दिग्रस तालुक्यातील वडगाव तांड्याच्या संगीता भाऊराव चव्हाण यांनी.  

00000

यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 यवतमाळ येथे वचनपूर्ती मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ महिलांचा सन्मान वाढविणारी योजना

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात लाभाचे वितरण

बहिणींना वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलोय

असंख्य बहिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाला बांधली राखी

राज्यातील बहिणींना लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न

यवतमाळ, दि. 24 (जिमाका) : गेल्या दोन महिन्यात महिलांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले. महिलांची समाजात, कुटुंबात भागिदारी वाढविण्यासोबत त्यांचा ‘सन्मान’ वाढविण्यासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी 40 लाख महिलांनी नोंदणी केली. त्यापैकी एक कोटी 7 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आपण रक्कम देखील जमा केली आहे. राज्यातील शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरुच राहील, असे यवतमाळ येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. जिल्हाभरातून 50 हजारावर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे कार्यक्रमस्थळी आगमण झाल्यानंतर असंख्य लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधून वचनपूर्तीनिमित्त त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॉ.अशोक उईके, आ.डॉ.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी उपस्थित होते.

काही दिवसांपुर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांचा महासागर यवतमाळ येथे पाहिला होता. आज देखील स्त्रीची विराट शक्ती दिसून येत आहे. या स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी यवतमाळ येथे आलो आहे. ज्या बहिणींची अद्यापही नोंदणी झाली नाही, त्यांची नोंदणी करून त्यांना एकाचवेळी तीन महिण्यांची रक्कम देऊ. प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करण्याचे आपले लक्ष्य आहे. योजना सुरळीत सुरु राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना 3 सिलेंडर मोफत देण्यात येत आहे.

राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक चांगल्या योजना महिलांसाठी आणल्या. राज्यातील महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याचे आमचे धोरण आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक बहिणीला लखपती होतांना पाहण्याचे स्वप्न आहे. लाडक्या बहिणींसोबतच लाडक्या भावासाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेतून भावांना महिण्याला 6 ते 10 हजारापर्यंत विद्यावेतन दिले जात आहे.

राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरु केली. 7.5 एचपी पर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेत सहभागाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांना मोबदला देणे बंधणकारक आहे. ज्या कंपन्या मोबदला देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

राज्य शासनाकडून स्त्री शक्तीचा जागर - देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्वसामान्य महिलांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने गेल्या काळात विविध कल्याणकारी योजना आणल्या. या माध्यमातून शासन सातत्याने स्त्री शक्तीचा जागर करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम करणारी योजना आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून मुलीला तिच्या 18 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये मिळणार आहे. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलतीचा प्रवास आपण सुरु केला. बचतगटांचा फिरता निधी वाढविला. 8 हजार 500 कोटी रुपये बचतगटांना दिले. काही दिवसांपूर्वी बदलापुर येथे अप्रिय घटना घडली. अशा घटना होऊ नये यासाठी गैरवर्तनाबाबत प्रत्येक शाळेत मुलींची विचारपुस केली जात आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला. येत्या दिवसात शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसाला 12 तास वीज मिळेल, यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागणार नाही. गेल्यावर्षी कापुस, सोयाबिनचे भाव पडले. यामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत देतो आहे. शेतमालाच्या भावात कमी येणार नाही, यासाठी प्रयत्न करतो आहे. वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा प्रकल्प विदर्भासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही - अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला खुष आहेत. योजनेच्या निकषात बसणारी एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. योजनेतून महिलांना 45 हजार कोटी रुपये आपण देतोय. ही रक्कम महिलांच्या हक्काची, अधिकाराची रक्कम आहे. या योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागाला गती मिळेल. 