गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५
अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाच्या सिव्हील लाईन येथील नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाच्या सिव्हील लाईन येथील नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.
शुभारंभप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर डुबे-पाटील, नागपूरचे सह आयुक्त कृष्णा जयपुरकर, मिलिंद काळेश्वरकर आदी यावेळी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाच्या नूतन इमारत पाच मजली असून या सुसज्ज इमारतीमध्ये खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्रसामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम १ हजार ५०० चौरस मीटर आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत. इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल. या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्र सामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा