सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
महाटीईटी-२०२५ परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर · २७ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवीता येणार · आक्षेप नोंदविण्यासाठी https://mahatet.in संकेतस्थळ
अमरावती दि. २२:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) २०२५ परीक्षेचे पेपर क्रमांक १ व २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १९ डिसेंबर रोजी परिषदेच्या https://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शासन निर्णय दि. २३ ऑगस्ट २०१३ अन्वये रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा राज्यभर पार पडली होती. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी दि. १९ ते २७ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवावे.
आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांनी https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून “आक्षेप नोंदणी” या लिंकचा वापर करावा. टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आक्षेपांचा कोणताही विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विषयतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा